


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.13सप्टेंबर):-राज्यात मोठ्या प्रमाणात गाय- बैलांवर लम्पि स्किन आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आधार असणाऱ्या गाय- बैलांचे मृत होण्याचीही संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, शेतीचे पीक यावर्षी गेले परंतु अनेक शेतकर्यांचे उदरनिर्वाह या जनावरांवर अवलंबून होते.
मात्र लम्पि स्किन नावाचे आजार शेतकऱ्यांची नवी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पालक म्हणून विचार करत आणखी कोणतेही दुर्घटना होण्या आधी जिल्ह्यातील गाय- बैल व अन्य लम्पि स्किन होऊ शकणाऱ्या जनावराचे मोफत व तत्काल लसीकरण करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्या कडे केलेली आहे.




