झाडिबोली साहित्य मंडळाचे शब्दसाधक शिक्षक, युवाचैतन्य व कार्यगौरव पुरस्कार जाहीर

55

🔹१८ सप्टेंबर ला गोंडपीपरी येथे होणार पुरस्काराचे वितरण

🔸१५ शिक्षक , २ युवक व १ प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14सप्टेंबर):- झाडीबोली साहित्य मंडळ झाडीपट्टीचे वैशिष्ट्ये साहित्यातून समोर आणण्यासाठी लिहित्या हातांना प्रोत्साहन देत असते . याचाच एक प्रेरक भाग म्हणून दरवर्षी साहित्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या झाडीपट्टीतील शिक्षक , युवक व प्रशासकीय अधिकारी यांना *झाडी शब्दसाधक शिक्षक , युवा चैतन्य व कार्यगौरव पुरस्कार* देत असते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाडीबोली साहित्य मंडळाच्या निवड समितीने झाडीबोली संवर्धन आणि चळवळीसाठी भरीव योगदान देणाऱ्या १५ साहित्यिक शिक्षकांची , २ युवकांची व एका प्रशासकीय अधिकाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.

झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार निवड समितीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर , जिल्हा महिलाअध्यक्ष प्रा.रत्नमालाताई भोयर व जिल्हासदस्य लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल्यांकन व परिक्षणाचे काम केले .झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या शिक्षक ,युवक व अधिकारी यांना १८सप्टेंबर २०२२ ला गोंडपीपरी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .

यात झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कारासाठी अनिल आंबटकर चंद्रपूर , नागेंद्र नेवारे मुल,सुरेश गेडाम सावली,प्रा. डॉ. मोहन कापगते ब्रम्हपुरी , संजय येरणे नागभीड ,सविता झाडे-पिसे चिमुर , संतोष मेश्राम सिंदेवाही ,चंद्रशेखर कानकाटे वरोरा ,भारती लखमापुरे भद्रावती, रत्नाकर चटप कोरपना ,अर्जुमनबानो शेख जिवती ,गायत्री शेंडे राजुरा ,प्रीतीबाला जगझाप बल्लारपूर ,सुधाकर कन्नाके पोंभुर्णा ,संतोषकुमार उईके गोंडपिपरी यांची तर झाडी युवा चैतन्य पुरस्कारासाठी रंजित समर्थ,गणेश खोब्रागडे,जुनासुर्ला यांची व झाडी कार्यगौरव पुरस्कारासाठी संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांची निवड झालेली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे .

सदर कार्यक्रमास जिल्हाभरातून साहित्यिक मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हासरचिटणीस रामकृष्ण चनकापुरे यांनी केले आहे .