आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्थापना दिवस’ व ‘माजी विद्यार्थी स्नेहमिलन’ सोहळा संपन्न

33

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.14सप्टेंबर):-आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे महाविद्यालयाचा ३० वा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक व संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंदनसिंग रोटेले, प्रमुख पाहुणे कारागृह अधिक्षक, येरवाडा कारागृह, पुणेचे दिलीपसिंग गिरासे, माजी प्राचार्य सुनिल सुभेदार, माजी सिनेट सदस्या रा. तु. म. नागपूर विद्यापीठ नागपूर किरणताई रोटेले, आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूरच्या प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर, माजी विद्यार्थी संघटना सदस्य राजेंद्र मर्दाने, आनंद भगत व त्यांचा संगीत संच, केडरॉक म्युझिकल फाऊंडेशन प्रामुख्याने उपस्थित होते.

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर हे ग्रामीण भागात समाजकार्याचे विद्यार्थी घडवत आहे. महाविद्यालय ग्रामीण भागातील असून देखील मागील तिस वर्षांपासून दर्जेदार शिक्षण देत आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विदेशातही नावलौकिक केला असल्याचा अभिमान वाटत असल्याचे व सध्या स्कूल सोशल वर्करची नियुक्ती करण्याकरिता फोरम संघटना कार्य करीत असल्याचे प्राचार्य डॉ. चंदनसिंग रोटेले यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत वरघने यांनी तर माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. सुरेश मिलमिले यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी विद्यार्थी आरती गोडे, लक्ष्मी शिवरकर, गोपाल मासुरकर, सुशील इंगोले, दीपक धोंगळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.