वैनगंगा नदीच्या त्रिवार पुराच्या फटक्याने शेतकऱ्यांच्या आत्म्याला जब्बर झटका

32

🔸प्रशासनाने रोख आर्थिक मदत देवून शेतकऱ्यांचा दाता म्हणून उभं राहवे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.15सप्टेंबर):- ऊन, पाऊस, किंवा थंडी असो तिन्ही ऋतू मध्ये कष्ट करणाऱ्या बळीराज्याला वैनगंगा नदीच्या सतत तीनदा येणाऱ्या पुराणे हतबल करून सोडलं आहे.पुन्हा तिसऱ्यांदा येणाऱ्या तीन दिवसांपासून पावसाने, सर्व सरोवरांचे दरवाजे उघडण्यात भाग पाडले आहे. पुजारीटोला ,संजय सरोवर , बावनथडी ,धापेवाडा,गोसेखुर्द अश्या पाच प्रकल्पाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीलगत सर्वच गावांना धोका असतो.

ब्रम्हपुरी तालुक्यतील अर्हेर- नवरगाव, पिंपळगाव, आवळगाव,बोढेगाव,लाडज,बेटाळा , कीन्ही या सर्व गावांना वैनगंगा नदीचा मोठा दणका दोनदा बसला असून पुन्हा तिसरी वेळ पुराणे शेतकऱ्याला फाशीची शिक्षाच दिली आहे.

“हे देवा तू सांग ना कुठं गेला हरवुनी लेकराची आन तुला आवतार आता तरी” “अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन उर जळून निघालं बघ करपल मन” हे गाणं आज शेतकऱ्याला तंतोतंत जोडून येत, खरंच आज या पृथ्वी तलावावर आज देव असता तर वैनगंगेच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू आवरायला उभा झाला असता. परंतु निसर्गाला थांबवणे अशक्यच. ही इतकी त्रिवार पुराणे केलेली बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्वरित कोणतेही निर्बंध न लादता रोख मध्ये आर्थिक मदत करावी. व शेतकऱ्याचा दाता म्हणून उभं राहवे इतकीच प्रत्येक शेतकरी आपली ईच्या दर्शवित आहेत.