गटशिक्षणाधिकारी साहेबांचा साईप्रकाश विद्यालय, साखरा तर्फे सत्कार

30

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.15सप्टेंबर):-दि.14 सप्टेंबर 2022 रोज बुधवार ला साईप्रकाश विद्यालय, साखरा ता. उमरखेड येथे दुपारी तीन वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख मुख्याध्यापक प्रकाशराव कदम सर तर प्रमुख अतिथी पंचायत समिती उमरखेडचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय सतीशजी दर्शनवाड होते. कार्यक्रमाचे स्वरूप साखरा केंद्राची मिशन आढावा लेखन वाचन बैठक होती. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेतून नवनियुक्त दर्शनवाडसाहेब यांची पंचायत समिती उमरखेड येथे गटशिक्षणाधिकारी पदीनिवड झाली. साईप्रकाश विद्यालय, साखरा येथे प्रथमच आगमन झाल्यामुळे व याच विद्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यालयाचे कुशल मुख्याध्यापक प्रकाशराव कदम सर तर्फे दर्शनवाड साहेबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळेस साखरा केंद्रातील केंद्रप्रमुख गायकवाड साहेब बोपीनवार साहेब घुगे साहेब केंद्रे साहेब वाघ साहेब भिबंरवाड साहेब केंद्रातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका तसेच बीआरसी कार्यालयाचे साधन व्यक्ती व तज्ञ शिक्षक यांची उपस्थिती होती. यावेळेस गटशिक्षणाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यशवंत कदम कारखेड यांनी केले. तर प्रमुख उपस्थिती चौधरी सर रमेश देशमुख सर संजय देशमुख सर कांबळे सर विजय माने सर किसन पवार पंजाबराव वानखेडे शेख सलीम व केंद्रातील सर्व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती. तर प्रस्तुत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कदम सर यांनी बोलक्या शब्दात केले व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.