महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “हिंदी दिवस ” उत्साहात साजरा

132

🔹हिंदी दिवसाचे औचित्य साधून निबंध व रंगभरण स्पर्धांचे आयोजन !…..

🔸मुख्याध्यापकांनी केला हिंदी-दिनी हिंदी विषय शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान !……

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.15सप्टेंबर):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १४ सप्टेंबर रोजी “हिंदी – दिवस ” मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाच्या औचित्य साधून शाळेत निबंध स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हिंदी शिक्षिका सौ.एम.के कापडणे होते. मान्यवरांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

हिंदी दिवसाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी हिंदी विषय शिक्षिका सौ.एम.के.कापडणे व पी.डी.पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. निबंध व रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले.

हिंदी विषय शिक्षक पी.डी.पाटील यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगुन आपल्या राष्ट्रभाषेचा सन्मान करा असे सांगून एक सुंदर हिंदी कवितेचे गायन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.एम.के.कापडणे यांनी हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार – प्रसार करा असा मुलांना संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी तर आभार एच.डी.माळी यांनी मानले.