


✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.15सप्टेंबर):-मुख्यमंत्री साहेब, तुम्ही बीजेपी सोबत सरकार स्थापन केले,आपण कुठे तरी दुखावले गेले शिवसेने मध्ये याचे कारण होते महाराष्ट्र चा विकास होत नाही व आमदारांची कामे होत नव्हते आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत तरी तुम्हला विश्वासात न घेता वेदांत समूह आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला वळवण्यात आले,वेदांत कंपनी गुजरातला जाणं, हा राजकारणाचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे.ही गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेरीट मिळाली आहे, ती ऑन मेरीटच राहिली पाहिजे महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रकल्प मिळत असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण महाराष्ट्राचा प्रकल्प तिकडे गेला, हे खूप मोठं दुर्दैव आहे. यामुळे लाखो नोकऱ्या जाणार आहेत.त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे.
त्यांनी यावर राजकीय करू नये, सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढावे.मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी इतर दौरे रद्द करून यावर चर्चा करावी त्यांनी घरगुती दौरे बंद करावेत.”फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला.
ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता.फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्पातुन राज्यात मोठी गुंतवणूक होणार होती त्यामुळे महाराष्ट्राला प्रचंड वस्तू व सेवा कर (GST)मिळणार होता.सद्याच्या काळात अनेक तरुणांच्या हाताला काम नाही.
आशावेळी तब्बल दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे येते राजकीय इच्छा शक्ती दाखवणे गरजेचे आहे.तुम्ही काही करा ,जसे तुम्ही शिवसेनेत तुमचा आवाज दाबला गेला होता तेव्हा जो आवाज तुम्ही अक्क्या जगाला दाखवून सत्तातर केले आणि मुख्यमंत्री झाले असे काही तुम्ही दिल्ली मध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्रा च्या हक्काचे व बेरोजगार तरुणाचा रोजगार बनणार होती ती कंपनी महाराष्ट्र मध्ये परत घेवून या ही नम्र विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे युवा राष्ट्रीय सचिव अजित संचेती यांनी पत्राद्वारे केली आहे




