गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

✒️ सिद्धार्थ दिवेकर(जिल्ह प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.15सप्टेंबर):-गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी करण्यात आले.

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व राष्ट्रीय सेवा योजना गो. सी. गावंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ.आत्मारामजी गावंडे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व “Thanks Giving Day” चे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले, त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर व दंत चिकित्सा शिबिर याचे आयोजन केले.

उमरखेड येथील विविध भागातील रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी व इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा रक्तदान केले.

या कायक्रमामध्ये रोटरी क्लब उमरखेडचे अध्यक्ष संदीप अग्रवाल, डॉ. विराणी,डॉ. राठोड, डॉ. अबरार, डॉ. व्यवहारे व इनरव्हील क्लबचे अध्यक्ष सौ कदम मैडम व ईतर सदस्य व अमेरिकेतील पाहुणे डॉ. ब्रिजु थंकाचन व डॉ. बेस्टी मॅडम या सर्वांचा मोलाचा वाटा होता.

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. राम देवसरकर, सचिव डॉ. यादवराव राऊत आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. कदम, डॉ. डी. व्ही. तायडे, डॉ. एस. आर. वद्राबादे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. एम. गुजर, पर्यवेक्षक प्रा. बी. यु. लाभसेटवार, प्र.अधीक्षक साहेबराव कांबळे,श्री. गजानन देवसरकर व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी व प्रा. डॉ. बी. एम. सावरकर,प्रा. अभय जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. ए. पी. मिटके, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन एस. एस. पाचकुडके, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED