दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूची CBI मार्फत चौकशी व्हावी. डॉ. राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.15सप्टेंबर):-166 अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यू ची चौकशी होने गरजेचे असून काही तरी गूढ लपल्याची शंका पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा संघटनेचे संस्थापक महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.*

दिवंगत आमदार रमेश लटके हे आर. टी.आय. ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करत होते, त्यांनी बऱ्याच विकासकांच्या कामावर माहिती अधिकाराच्या मार्फतीने माहिती संकलित करून त्यातील घोटाळे उघड करत असत आणी तक्रारी देत असत. यामुळे बहुतांश विकासक परेशान झाले होते.

दिवंगत रमेश् लटके यांचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला असला तरी या मृत्युची चौकशी होने महत्वाचे वाटते. शंकेचे निरसन होण्यासाठी या घटनेची कसून चौकशी होने अत्यंत गरजेचे असल्याचे मत ही पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केलि आहे.

यासंदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, दिवंगत रमेश लटके यांनी कोणकोणत्या विषयावर व कोणकोणत्या विकासकावर माहिती अधिकाराच्या मार्फतीने अर्ज केले होते त्याची चौकशी करावी शिवाय त्यांच्या मृत्यू च्या चौकशीची मागणी करणार असल्याचे सोसियेल मीडिया द्वारे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED