धम्मदेशना समारोह व 111 बुद्ध मूर्ती दान

39

🔸उमरखेडचे समाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर यांना बुद्ध मूर्ती देऊन

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.16सप्टेंबर):-गगन मलिक फ़ाउंडेशन व महात्मा फुले, आम्बेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे होणाऱ्या बुद्धमूर्ति दान समारोह मध्ये आपल्या नावाची निवड करण्यात आला होता.

या कार्यक्रमांचे आयोजन सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, शासकीय दवाखाण्यासमोर यवतमाळ येथे कारण्यात आला होता.

यवतमाळ जिल्ह्यातीला धम्म बांधवांना व उमरखेड येथील समाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर यांच्यासह एकुण 111 बुध्द मूर्ती व्हीयतनाम येथिल पूज्य भंते थिच बिन्ह ताम आणी आदरणीय गगन मलिक यांच्या हस्ते मूर्तिची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्तिथी म्हूणन महेंद्रे मानकर (स्वागत अध्यक्ष), हुयान ले, लिन्ह फाम, फुक निघिया,तूयन वो,तुंग निगुयेन इत्यादी अनेक धम्म बांधव भगिनी उपस्थित होत्या.