आयुष्य

28

आयुष्याची गणितं सोडवत असतांना ,
उत्तरे कधीच काढू नयेत,
कारण कधी कधी हरल्यावर ही आनंद होतो,
तर जिंकण्याने दु:खं.

आयुष्यांचे समीकरण मांडत असताना,
बरोबरीने मनासारखं घडेल असं नाही,
म्हणून बरोबरीच्या बाजूने डँस डँस द्यावे.
किती सुखांत जगलो ,किती दु:खांत जगलो, याचा हिशोब कसा द्यावा, कारण आयुष्यात अनुभवाला सुत्रच नसतो.

आयुष्याची वेळ ही ठरलेली असते,
त्यात तुम्ही कसे जगता ,हे तुम्हाला ठरवायचे असते.
आलेला क्षण हा मनसोक्त जगावा,
कारण पूढच्या क्षणाला आपण असू याचा का पूरावा ?

अनेक आव्हाहनांना इथे गिळंकृत करावं, त्यासाठी इथे मनशक्तीला पूरजोर बळ द्यावं,मनाचं काय ,हे तर क्षणात सारं जग फिरून येतं, त्यात आपण कसे जगलो हे महत्वाचं असतं.

✒️सुनिता टेंभूर्णे(तुमसर,जि.भंडारा)