नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लोडशेडींग मध्ये दिवसे दिवस वाढ

36

🔸अधिकारी लक्ष देईना ?

🔹१३२ के.वी.विद्युत केंद्र मंजूर करा

🔸नागरिकांची मागणी

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.16सप्टेंबर):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दिवसे दिवस विद्युत विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात लोडसेडीग केल्या जात असून या लोडसेडींगला कोणताही वेळ काळ राहिलेला नाही त्यामुळे विद्युत विभाग हा आपल्या मंनमानीने कोणत्याही वेळेत लोड सेडींग करीत असून लाईन गेल्यानंतर किमान एक तासापर्यंत ती येण्याची कोणतीही गॅरंटी नसते त्यामुळे या प्रचंड होणाऱ्या त्रासाला नांदगाव शहरासह तालुक्यातील नागरिक कंटाळले आहेत विद्युत विभागाचे अधिकारी हे बीलाच्या वसुलिकरिता नागरीक याच्या मागे तगादा लाऊन वसुली करतात मात्र त्याप्रमात नागरिकामा सुविधा मात्र का देत नाहीत ? असा संतप्त प्रश्न नागरिकांना पडला आहे. तालुक्यात वाढत्या या अघोषित लोडशेडिंग मुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे त्यामुळे तालुक्यात आता शासनाने नव्याने १४२ के. व्हि.चे विद्युत केंद्र मंजूर करावे आणि याकरिता लोक प्रतिनिधीसह आमदार,खासदार यांनी पुढाकार घेण्याची गरज भासत आहे.

कारण धामणगाव रेल्वे मध्ये २२० के. व्ही.चे केंद्र मंजूर असून चांदूर रेल्वे मध्ये १३२ के.वी.मंजूर आहे आणि आणखी एक १३२ के. व्ही.प्रस्तावित आहे परंतु नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मात्र एकही मोठे विद्युत केंद्र मंजूर किवा प्रस्तावित नाही मग हा या तालुक्यावर लोक प्रतिनिधीचा हेतूपरस्पर अन्याय नाही का ? असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक विचारत आहेत. यावरून असे दिसते की,नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा फक्त मतापुरताच फायदा है लोकप्रतिनिधी घेत असून विकासाचे काम फक्त धामणगाव आणि चांदुर रेल्वे येथे करायचे आणि नांदगाव खंडेश्वरला द्यायचा भोपळा ? असे संतप्त मत तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.