_अशोक मोहरकर महाविद्यालय अड्याळ येथे “ओझोन दिन ” संपन्न

51

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.16सप्टेंबर):-अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय अड्याळ येथे भूगोल विभागाच्या वतीने “जागतिक ओझोन दिन “साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. राजु ढबाले हे होते. भूगोल विभाग प्रमुख डाँ. रमेश बावनकुळे व भूगोल विषयाचे प्रा. किशोर हुकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्राचार्य डाँ. राजु ढबाले यांनी’ ओझोन थर ‘ टिकविणे काळाची गरज असून त्याकरिता जनजागृती महत्वाची आहे. असे सांगितले. डाँ. रमेश बावनकुळे यांनी ‘ओझोन थर ‘सजीव सृष्टी साठी अतिशय महत्वाचा आहे. असे सांगितले तर प्रा. किशोर हुकरे यांनी ‘ओझोन थर ‘सूर्यापासून निघणाऱ्या अतिनिल किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही व पृथ्वीचे रक्षण करतो. असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन करिश्मा चौधरी व आभार पुजा करंजेकर हिने मानले. याप्रसंगी महाविद्यालयीन विध्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.