देशात कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठीच डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला!- प्रा. किरण भोसले

53

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.16सप्टेंबर):- युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य तसेच मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद, शाखा- कोल्हापूर आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील पळसंबे ता. गगनबावडा येथील बौद्धकालीन लेणी अभ्यास दौरा व दीपोत्सव अत्यंत उत्साहाने तसेच मोठ्या संख्येने पार पडला. पळसंबे येथील विश्व शांती बुद्ध विहार येथे आयु. सचिन कांबळे, पळसंबे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आयु.सतिश भारतवासी यांनी अभ्यास दौऱ्याचा उद्देश तसेच दौऱ्यासंबंधीची रुपरेषा सर्वांना समजून सांगितली.ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि दिपोत्सव सुरु करण्यात आला. गगनबावडा तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आयु. रणजीत पाटील साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

बुद्ध पूजा युवा बौद्ध धम्म परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आयु.बापूसाहेब राजहंस,ज्येष्ठ धम्म उपासक आयु. नानासाहेब कांबळे,युवा बौद्ध धम्म परिषदेचे राज्याध्यक्ष आयु. डॉ. संतोष भोसले,करवीर तालुका सचिव प्रदीप सातपुते करवीर तालुका महिला अध्यक्षा आयुनी.मुक्ताताई भास्कर,लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे,धम्म अभ्यासक अमित मेधावी, युवा बौद्ध धम्म परिषदेचे राज्यसचिव सतीश भारतवासी, आयु.मेजर अशोक कांबळे, आयुनी.उषाताई कांबळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. कराड मधून आलेले लेणी संवर्धक आयु. स्वप्निल जाधव आणि आयु. कैलास कांबळे यांच्या नेतृत्वात सामुहिक त्रिसरण,पंचशील (महावंदना) ग्रहण करण्यात आले. युवा बौद्ध धम्म परिषदचे संस्थापक अध्यक्ष,आयु.प्रा.किरण भोसले यांनी मार्गदर्शनपर मनोगतात “आपण बौद्ध लोक शांती व समतेचे समर्थक आहोत. देशात कायदा व सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणूनच आधुनिक बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म आपल्याला दिला असून त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे.

या जगाचा इतिहास सांगतो की धार्मिक प्रचारासाठी बौद्ध धम्म अनुयायांनी कधीही कोणावर कसल्याही प्रकारचे आक्रमण केलेले नाही. यामुळेच हा बौद्ध धम्म जगभर पसरला आहे, तिच परंपरा आपण सर्वांनी अंगिकारुन पुढे चालत राहू व या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचे उदाहरण समाजापुढे ठेवू.” असे मत मांडले. मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्थेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक आयु.डॉ.संतोष भोसले यांनी संस्थेची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आणि “राज्यातील सर्व लेण्या अभ्यास,लेखन,संशोधन आणि योग्य कृतीकार्यक्रमांच्या आधारे उजागर करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत” असे प्रतिपादन केले. आयोजकांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत पळसंबे येथील जयभीम ग्रंथालयाला आयोजकासह अनेक बौद्ध बांधवांनी ग्रंथ प्रदान केले.

आयु. राजेंद्र इनामदार कोल्हापूर, आयु. बाबसाहेब माने वारणानगर, आयु. नानासाहेब कांबळे हुपरी,आयु.रविंद्र हलसवडेकर कोल्हापूर, आयु. अभि. बापूसाहेब राजहंस हळदी, बुद्ध प्रवाह चोकाक, आयुनी. सुनिता वाघवेकर, बुद्ध विहार शिंगणापूर, आयु.सदा पाटील कुदळवाडी, आयुनी.मंगल श्रीपती कांबळे आणि आयु.शिवराम तुकाराम कश्यप या दानशूर बांधवांनी या ग्रंथालयाला पुस्तकासाठी रोख मदत केली. आयु.महेंद्र लिगाडे साहेब आणि कुटुंबीयांनी या ग्रंथालयासाठी घडविलेली तिजोरी भेट दिली.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे घनिष्ट मित्र आणि सत्यसुधारक हॉटेलचे मालक गंगाराम कांबळे यांचे नातू आदरणीय तात्यासाहेब कांबळे, कोल्हापूर यांनी लेणी अभ्यास दौऱ्यास भेट देऊन ग्रंथदान केले. ग्रंथ, वस्तू आणि आर्थिक दान पळसंबेमधील आयु. सचिन यशवंत कांबळे,आयु. अशोक शिवाजी कांबळे,आयु.दत्ताराम शांताराम पळसंबेकर,आयु.बाबासो सोनबा कांबळे,आयु.श्रीकांत जानकू कांबळे आणि महिलांच्या शिष्टमंडळाने स्वीकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश भारतवासी यांनी केले.

पळसंबे बौद्ध लेणी दौऱ्यामध्ये लेणींना भेट देण्यात आली. या लेण्यांबाबत लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे यांनी मुसळधार पावसामध्ये जोखीम घेऊन लेण्यांची सचित्र माहिती दिली. या दौऱ्याला जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलिस आयुक्त कोल्हापूर जिल्हयातील सर्व परिवर्तनवादी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संस्था संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी पंडित चोपडे सर,बी. एम. कांबळे, बाळासाहेब कांबळे,तुषार कांबळे,साहिल माने,बाळनू ऊर्फ संतोष भोसले,ओंकार कांबळे कोदवडेकर (रेस्क्यू फोर्स),सुहास लाटवडेकर, महेश बावडेकर,नितीन नेजकर,प्रदीप सातपुते बोलोलीकर, भारत कांबळे आरळेकर, विनोद कांबळे,वैशाली कांबळे,योगेश कांबळे किरवेकर,भगवान कांबळे, माणिकमाला चव्हाण,राजश्री कांबळे, रघुनाथ कांबळे,आम्रपाली माने, आरती ढाले,पल्लवी कांबळे, मंदाताई सोनताटे,अमोल कांबळे वाघवेकर,विजय यशपुत्त,विजय पाटील, दयानंद जिरगे सर,धनाजी कांबळे, भारती ढाले,आकाश कांबळे, भास्कर चव्हाण,जयश्री सोरटे, शेवंता कांबळे,जिल्हयातील सर्व सन्माननीय मिडियाचे पत्रकार यांच्यासह २ राज्ये, ४ जिल्हे आणि १२ तालुक्यातून २०० हून अधिक धम्म बांधव उपस्थित होते. आयोजन समिती तर्फे सर्वांचे कौतुक, अभिनंदन आणि आभार प्रदर्शन करण्यात येत आहे.