अजितदादा पवार खोटे बोलता का?

30

मा.अजितदादा पवार,
तुम्ही सुद्धा खोटे बोलता का? १५/९/२०२२ला जळगाव जिल्ह्यात आले आहात.असेच आधी आले होते.१७डिसेंबरला.तेंव्हा उपमुख्यमंत्री होते.जळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ३कोटी७१लाखाचा अपहार बाबत आपणाकडे तक्रार केली होती.दिनेश भोळे यांनी समक्ष भेटून अपहार समजावून दिला.दस्तावेज दिलेत.आपण आश्वासन दिले कि,मी यातील कोणालाही सोडणार नाही.

दादा,मग तुम्ही तर सोडले त्यांना.का सोडले?कसे सोडले? काही देऊन घेऊन सोडले का? या अपहारात पालकमंत्री गुलाबराव पाटील तुमचे सहकारी मंत्री होते म्हणून सोडले का? आरोग्यमंत्री राजेश टोपे तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून सोडले का? तुम्ही जबाबदारीने याचे उत्तर दिले पाहिजे.

दादा, तुम्ही असोत कि,जयंत पाटील असोत, जळगाव जिल्ह्यात यात्रेला येतात कि,दुसरे काही गुपचूप काम असते.कारण तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांना भेटतात.तर मग, आम्ही तुमच्या राजकीय परिघात येत नाहीत का? आम्ही तुम्हाला विरोधी पक्षनेता समजू नये का? तुम्ही फक्त राष्ट्रवादीसाठी विरोधी पक्षनेता बनले आहात का? आम्ही तुम्हाला, राष्ट्रवादी ला मतदान करू नये का? तुम्ही जर जिल्ह्यातील अन्य लोकांना भेटत नसाल , अपहार बाबतीत चूप बसले असाल तर तुमच्यावर आम्ही संशय घेणारच.

दादा ,आधीच दोन मंत्र्यांनी २५९१मृतांच्या टाळूवरचे लोणी चाटले आहे.तुम्हाला किमान तुम्ही तरी संवेदना दाखवा.आता १५।९।२०२२ला जळगावात आला आहात तर जाहीरपणे बोला.एसपींना फोन करा किंवा भेटा.सांगा ठासून,अपहाराची एफआयआर नोंदवा.आम्ही राष्ट्रवादी असा अपहार सहन करणार नाहीत.
जळगाव जिल्ह्यात आले आहात तर भाजपने काय केले?शिंदेंनी काय केले?ते रडत रडत सांगू नका.ते रडणे जास्त झाले.आता कामाला लागा.विरोधी पक्ष नेता आहात तर जबाबदारीने काम करा.तुम्ही जळगाव जिल्ह्यात विरोधी पक्षनेता म्हणून आलेत,तर तसे काम केले पाहिजे.मुख्यमंत्री शिंदेंनी काय केले?काय करायला नको?हे तुम्ही सभेत सांगितले.पण तुम्ही तरी काय केले? तुम्ही श्रोत्यांची करमणूक करून गेले.असा कोणता राजकीय, शासकीय, प्रशासकीय मुद्दा हाती घेतला? जिल्ह्यातील लोकांना हसवायला आले होते का?

दादा, तुम्ही १७डिसेंबरला जळगावात आले.दूध फेडरेशन मधे सभा झाली.तेथे आपणास समक्ष भेटून कोरोनाकाळातील अपहार बाबत तक्रार दिली.समजावून दिली.आपण समजले.आश्वासन दिले कि,मी यापैकी एकालाही सोडणार नाही. आता ९ महिने झाले.९महिन्यात तर, देशाची लोकसंख्या हजारोंनी वाढते.येथे एक तक्रार मार्गी लागली नाही.म्हणाले होते,मी एकालाही सोडणार नाही. तुम्ही तर सोडले.का सोडले?कसे सोडले?ते समजलेच नाही.म्हणून संशयाची सुई तुम्हाला टोचत आहोत.संवेदना ,वेदना होतात का?ते तरी सांगा.

दादा, तुम्ही मंत्री झालेत काय, उपमुख्यमंत्री झालेत काय, मु44ख्यमंत्री झालेत काय , आम्ही जनतेला काय देणघेणं?तुम्हीच पररस्पर देणंघेणं करून आमच्या तक्रारीकडे डोळेझाक करीत असतील तर याची वाच्यता तर झालीच पाहिजे.आम्ही कागदोपत्री सहित तुमच्या कडे तक्रार केली आहे.कागदोपत्रे सहित पोलिसात तक्रार केली आहे.कागदोपत्रेसहित कोर्टात खटला दाखल केला आहे.कोर्टाने पोलिसांना कलम १५६।३अंतर्गत आदेश देऊनही पोलिस एफआयआर नोंदवत नाहीत, आरोपपत्र दाखल करीत नाहीत.तर मग, तुम्ही उपमुख्यमंत्री असूनही काय उपयोग? कशासाठी बनलेत उपमुख्यमंत्री? तुमच्या पक्षाचे4 आमदार दिलीप वळसे पाटील गृहमंत्री बनून उपयोग काय? आणि आता तुम्ही विरोधीपक्षनेता बनून उपयोग काय?आम्ही तुमच्या कडून, तुमच्या गृहमंत्री कडून काय अपेक्षा ठेवायची? तुम्ही जळगाव जिल्ह्यात आलात तर फक्त करमणुकीचे कार्यक्रम घेण्याची अपेक्षा ठेवायची का?ते काम तर तमाशगीर करतात,नाटककार करतात,तमाशावाले करतात.हवा येऊ दे वाले करतात.हास्यजत्रा वाले करतात.तेच काम करण्यासाठी तुम्ही जळगाव जिल्ह्यात आले होते का? तर मग,लठ्ठ मानधन,गाडी मोटर,फौजफाटा चा खर्च फजूल गेला.

एकतर राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये आहेत.दिलीप वळसे पाटील ,यांना जळगाव मधील अपहाराचा विषय समजावून दिला.पण ते अजून झोपेतच आहेत.पन्नास आमदार महाराष्ट्र सोडून पळून गेले.सरकार कोसळले ,तरीही त्यांना जाणिव झालीच नाही.तुम्हाला तरी जाणिव झाली पाहिजे.तुम्हाला राष्ट्रवादी पार्टी चालवायची आहे कि भाजपात जायचे आहे?

दादा, आम्ही काना कोपऱ्यात भेटून सांगितले असते तर, तुम्ही नाकबूल केले असते.मला कोणी असे भेटलेच नाही.मला कोणी असे सांगितलेच नाही.म्हणून आम्ही भेटलो, तुम्ही बोलले,त्याची आडिओ, व्हिडिओ क्लीप काढतो.मना करू नका.भेट काय,कायभार सुद्धा पारदर्शक झालाच पाहिजे.म्हणून आम्ही हे असे जाहिरपणे बोलतो,लिहीतो,आवाहन करतो.जसे तुम्ही हजारोंच्या सभेत बोलता,टाळ्या घेता.तसे हे सुद्धा जाहिरपणे झालेच पाहिजे कि,“श्रीमान अजितदादा पवार खोटे बोलतात.”

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव