बीडमध्ये भर पावसात हजारो शेतकरी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

32

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.16सप्टेंबर):-विमा कंपनीने अग्रीम विमा तातडीने द्यावा, अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करावे आणि लम्पी संसर्ग रोगापासून पशुधन वाचवावे, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. शुक्रवारी भर पावसात लोकप्रतिनिधी आणि हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत न्याय मागणीसाठी आवाज उठवला. संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर या आंदोलनाने गजबजून गेला.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले. पालकमंत्री नाही, सरकारचे लक्ष नाही, पहिल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत कापसाची वाट लागली. तर ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने सोयाबिन उद्धवस्त झालं, खरिप हंगाम हातचा गेल्यानंतर लम्पी आजाराने थैमान घातले. पशुधन धोक्यात आले. लसीकरणाची घोषणा झाली. मात्र पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लसी उपलब्ध नाहीत, शेतकरी चिंतेत आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासन आणि प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याने शुक्रवारी आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली भर पावसामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.