बहुजन समाज पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

✒️श्रीरामपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

श्रीरामपूर(दि.17सप्टेंबर):- बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड स्वस्तिक चौक, अहमदनगर येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी दिली.

या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.खा. अशोक सिद्धार्थ , महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. प्रमोद रैना , महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. नितीन सिंगजी, तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. संदीपजी ताजणे व मा. महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव बाळासाहेब अवारे , वरील राज्याचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहे.

“शासन कर्ते बना..! हे होऊ शकते ..!” या घोषवाक्याच्या तत्त्वावर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून पक्षाची ध्येय धोरणे, समाजाप्रती असलेली कर्तव्य, काम करण्याची पद्धत, न्यायासाठी संघर्ष, कायदा, मतदान प्रक्रिया आदी बाबत मार्गदर्शन करून उपस्थितांचे मनोबल वाढविणार असल्याचे मा.प्रकाश अहिरे यांनी सांगितले. त्यामुळे या कार्यकर्ते मेळाव्याला तळागाळातील कार्यकर्त्यांनी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी व सर्व बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED