मानसिक,शारीरिक आणि बौद्धिक दुबऀलतेमुळे होतात आत्महत्या

🔹 मेंदूतील बायो- न्यूरॉलॉजीकल बदलामुळे जिवन निरर्थक वाटते.

🔹आत्महत्येंच्या घटनांचे स्वार्थासाठी करतात राजकीय भांडवल.?

🔹 मदत न करता प्रसिद्धीसाठी करतात खोटे आरोप.

✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.17सप्टेंबर):-जगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. आणि त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. आत्महत्या करण्याचा विचार येणं हे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आजाराचे लक्षण आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 15 ते 19 वर्ष या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं प्रमुख कारण आहे.आत्महत्येमागे नैराश्य, असुरक्षितता, जीवनाबद्दल नकारात्मकता, असहाय्यता, मानसिक असंतुलन शारीरिक दुबऀलता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. वैद्यकीय कारणही असतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणजेच Suicide Prevention Day च्या निमित्ताने, आत्महत्येबाबत सामान्यांना पडणारे प्रश्न आणि आत्महत्येचा विचार मनात आलेल्यांशी कसं बोलावं हे जाणून घेणे महत्वाचे आहे. लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारतज्ज्ञ ‘सुसाइट आयडिएशन’ म्हणतात.

म्हणून प्रत्येकांनी मानसिक आरोग्याबद्दल जागरूक असले पाहिजे.
मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणं कारणीभूत नसतं. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो, असं तज्ज्ञ म्हणतात.दिलशाद खुराना Mpower या मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाईनच्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात, “माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही. आयुष्य संपवणं हा एकच मार्ग आहे. लोकांच्या मनात येणाऱ्या या विचारांना ‘सुसाइट आयडिएशन’ म्हणतात.”

नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असा सर्वसाधारण समज आहे. याचं कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. यामागे वैद्यकीय कारणंही आहेत .मानोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, “आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो- न्यूरॉलॉजीकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं. त्यामुळे, आत्महत्येचे विचार येतात. आत्महत्येच्या 90 टक्के प्रकरणात मानसिक असंतुलन, शारीरिक दुबऀलता, बौद्धिक आजार प्रमुख कारण आहे.”डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात. जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार डिप्रेशन किंवा नैराश्य
मानसिक स्थितीत चढ-उतार सतत चिंता किंवा अस्वस्थता, सतत मनात नकारात्मक विचार भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना , मानसिक, शारीरिक बौद्धिक आजारानेग्रस्त व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करतो.

मुंबईच्या केईएम रुग्णालयातर्फे मानसिक आरोग्यावर समुपदेशनासाठी ‘हितगुज’ हेल्पलाईन कार्यरत आहे. विभागप्रमुख डॉ. अजिता नायक म्हणतात, “सुसाईड प्रतिबंध हेल्पलाईन रुग्णांशी संपर्काचा पहिला टप्पा असतो.

आत्महत्येचा विचार मनात आल्यानंतर, थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं शक्य नाही. अशावेळी या हेल्पलाईनवर संपर्क केल्यामुळे मदत मिळू शकते.” मनात आत्महत्येचा विचार आल्यास मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईनला संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेशक किंवा डॉक्टरांना भेटा.आत्महत्येचा विचार का येतो, हा किती गंभीर आहे याचं निदान महत्त्वाचं आहे. “आत्महत्येचा विचार येताक्षणी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वत:साठीच धोका असतो. ते स्वत:लाच हानी पोहोचू शकतात. त्यामुळे तात्काळ योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.”मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला कुटुंबाची साथ सर्वांत जास्त महत्त्वाची असते. कुटुंबियांनी आणि सामान्यांनी विचार न करता माहित नसलेला चुकीचा सल्ला देऊ नये.कॅज्युअल सल्ले देऊ नयेत. आत्महत्येच्या विचारांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की, विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही. असे अनेक गैरसमज आहेत.

“आत्महत्येचा विचार मनामध्ये केव्हाही येऊ शकतो.” आत्महत्येचा विचार फक्त लक्ष वेधण्यासाठी असतो.आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आहेत. असे डॉ. अंबरीश धर्माधिकारी म्हणाले.आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत घेऊन आपले जीवन चांगले करता येते. “आत्महत्येचे सातत्याने विचार येत असलेल्या गंभीर प्रकरणात इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह (ECT) थेरपी अत्यंत उपयुक्त आहे. याला सामान्य भाषेत शॉक थेरपी म्हणतात. पण, यात शॉक दिला जात नाही. यात रिकव्हरी खूप फास्ट होते.”थॉट मॉडिफिकेशन, चिडचिडेपणा कमी करण्याच्या टेक्निकचा तिला फायदा होतो. त्या सांगतात, “तुम्ही तुमचे जर विचार कोणाला सांगू शकत नाहीत. तर, लिहून काढा. जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकता.

प्रसिद्ध आणि चर्चित व्यक्तीने आत्महत्या केली. तर आत्महत्येच्या विचारांबाबत हेल्पलाईनवर व्यक्त होणारे कॉल्स अचानक वाढतात. “प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केली. तर, लोकांना आपणही वैद्यकीय मदत घेतली पाहिजे याची जाणीव होते. त्यामुळे, जेव्हा मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. लोक मदतीसाठी फोन करतात.”बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयाच्या हितगुज हेल्पलाईनवर येणारे कॉल्स चार-पाट पटीने वाढले होते.हितगुजच्या समुपदेशक संगीता राव (नाव बदललेलं) सांगतात, “सुशांतच्या आत्महत्ये नंतर 15 दिवस खूप फोन आले. तो यशस्वी होता तरी त्यांनी आत्महत्या केली? अपयश इतका परिणाम करतं? असा लोकांचा प्रश्न होता.” सामान्यत: आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांचं प्रमाण जास्त आहे. पण, कोरोना संसर्गाच्या काळात आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे. तर, कौटुंबिक संबंधात स्त्रियांमध्ये आत्महत्येच्या विचारांचं प्रमाण जास्त आहे. अलिकडे सर्वत्रच आत्महत्येचे प्रमाण वाढले असून त्यामागची कारणीभूत परिस्थितीचा विचार न करता राजकीय पक्ष निवडणूक आणि प्रसिद्धीसाठी भांडवल उभे करतात. असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. खोटे दोषारोप ठेवीत असतांना सामाजिक जबाबदारीची जाणिव, कर्तव्य याचा विचार केला पाहिजे.

नागपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, विदर्भ, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED