उमरखेड येथे अभियंता दिवस साजरा

516

🔸देशातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक विषमता दूर केली पाहिजे :- प्रवीण देशमुख

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.17सप्टेंबर) :-येथील स्थानिक राजस्थानी भवन येथे तालुका इंजिनिअर संघटनेच्या वतीने मोक्षगुंडम विश्वेश्वरेय्या यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस दि 15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भाचे प्रख्यात व्याख्याते प्रविण देशमुख यांनी बोलतानादेशातील आर्थिक शैक्षणिक सामाजिक विषमता दूर केली पाहिजे व लोकं वेदना झूम करून पाहत नाही तर वर्तमानात इमेजला झूम करून पाहतात .अभियंता दिवस निमित्त असंख्य भारताचे वर्तमान परिस्थिती विषयावर व्याख्याते प्रवीण देशमुख यांनी बोलताना सामान्य लोकांनी आपले बालपण हरवलेले आहेत .राजकीय लोकांना शैक्षणिक विषमता, सामाजिक विषमता व आर्थिक विषमता , या संदर्भात काही देणे घेणे नाही फक्त सत्ता करणासाठी राजकारण केल्या जातो . भारत हा भांडवलदाराचा ग्राहक देश आहे.

भांडवलदारांनी सामान्यांच्या डोक्यात जाहिराती पेरले गेले आहेत . तसेच राजकीय परिस्थितीवर बोलताना आत्ता फक्त सत्ता करण करण्यासाठी राजकारणात लोकांचा प्रवेश होत आहे.

मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनामध्ये लाखो लोकांचा रोजगार गेला याचा राजकीय लोकांवरती कुठलाही प्रभाव पडला नाही.
परंतु आमच्या राजकीयांना फक्त जातीय भेद मंदिर -मशिदीकडे जास्त लक्ष .सामान्यांना रोजगार , बेरोजगारी, शिक्षणामध्ये विषमता, शेतकरी आत्महत्या, युवकांचे प्रश्न ,खाजगी शाळा व सरकारी शाळांच्या शिक्षणामधील तफावत.

स्त्रियांच्या असुरक्षित विषयी ज्या देशात स्त्रियांचा मान राखल्या जातो त्या देशात पर मिनिटाला तीन महिलेवर अत्याचार होतो.

मोबाईलचा शोध जापान नी लावला परंतु सर्वात जास्त वापर भारतीय घेतात.पर डे दीड जीबी कशी संपवायची. पॉर्न सर्च मध्ये भारत जगातून प्रथम क्रमांकात युवकांनी आपला आयडल समोर ठेवला पाहिजे युवक इतिहास विसरत चालला आहे.

छ. शिवाजी महाराज, भगतसिंग,राजगुरू, सुखदेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांना आपला आदर्श ठेवत संघर्ष करीत राहिले पाहिजे असे विचार व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भास्करराव पंडागले तर प्रमुख उपस्थितीत सुरेंद्र कोडगिरवार , अभियंता चिन्नावार , दत्ता गंगासागर, संघटनेचे अध्यक्ष सतिश पत्रे, धनंजय गावंडे ,सावंत पाईकराव हे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता स्वराज देवसरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अभियंता कृष्णराऊ पंडागले यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अभियंता निलेश हेलगंड ,अभिषेक सुरते ,सुधाकर काळबांडे, राजेश दिघेवार, विनायक मुधोळ,अश्विन कन्नावार, प्रणव कदम, वैभव कोसलगे व शेख सोहेल यांच्यासह कंत्राटदार बांधव ही कार्यक्रमात उपस्थित होते.