मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उखळी येथे वैज्ञानिक जाणीव अभियान कार्यक्रम संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18सप्टेंबर);-ग्रामपंचायत कार्यालय”,केंद्रीय प्राथमिक विद्यालय उखळी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित वैज्ञानिक जाणीवा कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रांगणात गावचे सरपंच राजेभाऊ सावंत.यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

वैज्ञानिक जाणिवा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उखळी गावचे उपसरपंच नवनाथ मुजमुले यांची होती तर प्रमुख अतिथी मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.जगदीश नाईक,प्रा रफिक शेख,डॉ.सारिका सावंत,प्रकाश शिंगाडे,माणिकराव लिंगायत, अमोल लांडगे,मुंजाजी कांबळे, राहुल साबणे यांची उपस्थिती होती.यावेळी वैज्ञानिक जाणीवावर बोलताना डॉ. जगदीश नाईक म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलनावर किंवा प्रबोधनावर बोलताना प्रत्येक कुटुंबांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आमच्याकडे पेशंट म्हणून नागरिक येत असतात प्रत्येकाच्या हातावर अंधश्रद्धा म्हणून नागरिकांच्या दंडाला हाताला काही ना काही बांधलेले असते त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी ठरवलं पाहिजे की मी विज्ञानवादी होऊन माझे जीवन सुखकर कशी बनवेल?याचा विचार करावा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक तुम्ही आम्ही समजून घ्यावा त्यातूनच आपली आपल्या जीवनातील अंधश्रद्धा दूर होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून स्वच्छते विषयी शपथ घेण्यात आली.

वैज्ञानिक जाणीव कार्यक्रमांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश शिंगाडे यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले प्रास्ताविक उत्तमराव सुरनर यांनी केले तर मुंजाजी कांबळे,अमोल लांडगे ,डॉ.रफिक शेख, माणिकराव लिंगायत यांचेही मनोगते झाली.यावेळी प्रामुख्याने शाळेच्या प्रांगणामध्ये उखळी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कुलकर्णी यांनी केल्यामुळे कार्यक्रमाचा उत्साह वाढतच केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय व केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने परिश्रम घेण्यात आले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED