तरटगाव – शिंगोलीत अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(ता.18सप्टेंबर):- तरटगाव- शिंगोली (ता. मोहोळ) येथील इंजि. सोमनाथ दावणे व इंजि. शंकर दावणे यांच्या महावीर कंट्रक्शन कंपनीच्यावतीने 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी महावीर कंपनीच्या वतीने आदर्श अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. अभियंताचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन हा भारतभर अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जनहिताचे कार्य करणाऱ्या आदर्श अभियंत्याचा सत्कार महावीर कंट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा इंजि. सोमनाथ दावणे व इंजि. शंकर दावणे या बंधूंच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य व यांत्रिकी अभियंता अजिंक्यराणा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी टपन डंके (सो.म. पा. अभियंता) नंदकुमार जगदने  (सो.म.पा. अभियंता)  गायकवाड साहेब  (पाटबंधारे विभाग) बंडगर साहेब (पं. स. मोहोळ अभियंता) दळवे साहेब (पं. स. मोहोळ अभियंता)  अविनाश वाघमारे (सो.म.पा.अभियंता) सचिन किरनाळे( लघुपाट बंधारे, अभियंता) पाटील ईन्फ्रा संचालक महेश पाटील , अगरवाल साहेब , अल्ट्राटेकचे मॅनेजर शितलकुमार सिंदखेडे, रोहित रासेराव (विद्युत अभियंता राष्ट्रीय महामार्ग) यांच्यासह संतोष मते, सागर भोसले, इंद्रजीत ननवरे, केदार पाटील, भारत साळुंखे, नरेंद्र जतकर, आकाश धनिवले, स्वप्निल रणदिवे, हर्षद शेख, करण निकम, आदित्य जगदने, आदेश जगधने, विशाल घाटगे, रितेश मदने, सुरज ढवळे, आशितोष मलशेट्टी, दिग्विजय शिंदे आदी अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गावचे सरपंच अविनाश मोटे, उपसरपंच पांडुरंग रासेराव, सोसायटी चेअरमन कानिक मोटे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माऊली जाधव यांनी केले तर आभार इंजि. सोमनाथ दावणे यांनी मानले यावेळी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED