११७ व्या बँक ऑफ इंडिया वर्धापनदिन निमित्त टाहकाटोला विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तूचे वितरण

✒️वशीम शेख(विशेष प्रतिनिधी,कोरची)मो:-9404925488

कोरची(दि.18सप्टेंबर):- दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी. विद्यार्थी आपले भविष्य उज्वल बनवुन विकास साधावा या हेतूने कोरची बँक ऑफ इंडिया शाखेच्या ११७ व्या वर्धापनदिनानिमित्त टाहकाटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय भेट वस्तूंचे वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी शाखा व्यवस्थापक सतीश कावरे बोलत होते. पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाहकाटोला येथे बँक ऑफ इंडिया शाखेचे ११७ वर्ष पूर्ण झाल्याने १७ सप्टेंबर शनिवारला बँक ऑफ इंडिया शाखा कोरची च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक सतीश कावरे, प्रमुख अतिथी अतिरिक्त शाखा व्यवस्थापक नंदकिशोर नाकाडे, शाळा समिती सदस्य दर्याव मडावी, तुळशीराम मडावी, फत्तेसाय नैताम, बी सी कर्मचारी सलीमखान पठाण, रंजीत सरजारे, विशाल सहारे, अविनाश अंबादे उपस्थित होते.

टाहकाटोला जिल्हा परिषद शाळेतील १६ विद्यार्थ्यांना व अंगणवाडी केंद्र येथील १२ विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेचे दप्तर, टिफिन बॉक्स व शालेय साहित्य भेट वस्तूचे वाटप केले साहित्य मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद बघायला मिळाला. शाळेचे मुख्याध्यापक गौरव कावळे यांनी अशा प्रकारच्या बँकेच्या उपक्रमांची स्तुती केली या उपक्रमातून विद्यार्थ्यांची शालेय विषयी आवड निर्माण होऊन शालेय उपस्थितीत व शालेय गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त करत बँक ऑफ इंडीया शाखेचे कर्मचाऱ्यांचे स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक गौरव कावळे तर आभार शाळा समिती सदस्य तुळशीराम मडावी यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED