

🔹गावकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर न देताच सरपंच सतीश चव्हाण यांनी ग्रामसभेतून पळ काढला
🔸जातेगावात लाखो रुपयांचा ग्रामपंचायत ने केला भ्रष्टाचार ? ग्रामस्थ आंदोलनाच्य पावित्र्यात
✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.18सप्टेंबर):-तालुक्यातील जातेगाव येथे पाच वर्षात मासिक सभा ग्रामसभा कधी झाल्या माहित नाही मात्र कार्यकाळ संपायच्या शेवटच्या टप्प्यात जातेगावच्या ग्रामपंचायत सरपंच सतीश चव्हाण यांनी विना ग्रामसेवक ग्रामसभा घेतली यावेळी ग्रामपंचायतच्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी गावकऱ्यांनी प्रश्न विचारताच सरपंच सतिश चव्हाण यांनी ग्रामसभेत उत्तर न देता पळ काढला आहे विशेष म्हणजे रेल्वे आणतोय विमान आणतो अशा पद्धतीने उडवडीचे उत्तर देऊन गावकऱ्यांच्या प्रश्नाला दुजारा देत दिशाभूल केली
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे ग्रामसभा ही 17 सप्टेंबर रोजी सकाळी घेण्यात आली विशेष म्हणजे सरपंचांनी शिपायालाच सचिव करून ग्रामसभा बोलवली पाच वर्षात ग्रामसभा मासिक सभा कधी झाल्या माहीत नाही मात्र शेवटच्या टप्प्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे प्रकार आतुरमातुर ग्रामसभा बोलून उत्तर न देताच आणि प्रश्नाचे वेगळेच उत्तर देऊन सरपंच सतीश चव्हाण यांनी ग्रामसभेतून पळ काढला मातोश्री पादन रस्त्याचं काय झालं, जातेगाव च्या बाजाराचा लिलाव झाला का, व इतर कारखाना टावर देशी दारू दूकान यांचा कर जमा कोणाच्या खात्यात आहे, यासह पंधरावा चौदावा, निधी खर्च कुठे केला कसा केला याचे उत्तर देता नाही आल्याने सरपंचांची नाकि नुई आली, विशेष म्हणजे ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडिमार करतात सरपंचांनी विचित्र प्रकारे उत्तर दिले, ग्रामस्थांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताच मात्र सरपंचाला घाम फुटला, जातेगाव येथे आजवर कुठलीही ग्रामसभा मासिक सभा जनतेसमोर घेतली नसून ग्रामपंचायतचे शासकीय रजिस्टर मस्टर रजिस्टर,कागदपत्रे हे वैयक्तिक सरपंचा च्या घरी आहेत असाही आरोप गावकऱ्यांनी केला त्याचे पण उत्तर सरपंचांनी दिले नाही.
यामध्ये अजून एक मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे वेस बांधकामाचा, पंधरावा वित्त आयोगातुन यातुन वेस बांधकाम करण्यात येणार आहे मात्र आत्तापर्यंत कोणालाही सांगितलं नाही सरपंच स्वखर्चाने बांधकाम करणार असे भासवले, मी वैयक्तिक खर्चातून वेस बांधत आहेत, तसेच विविध मुद्दे ठराव घेण्याची प्रक्रिया झाली जातेगाव नजीक ताडाशेजारी माळी समाजाची स्मशानभूमी असून त्या ठिकाणी माळी समाजाला सिमेंटचा बांधकाम करण्यात यावे व तांड्यातील घरा शेजारी होत असलेली जाणीवपूर्वक अंत्यविधी दूर करून त्यांना स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी असेही सांगण्यात आले, रोजगार हमी पाणीपुरवठा घरकुल ,रमाई घरकुल, व तसेच गावकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभे ठराव मध्ये घेण्यात यावे, तांडा वस्तीवर पंधरावा वित्त आयोगातुन काय कामे केले, असंख्य प्रश्नाचा भडिमार ग्रामस्थांनी करतात मात्र सरपंचाला एकही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
सरपंचाच्या बोलण्यातून असे सिद्ध झाले की लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्यांच्या हातून झाला आहे आणि उत्तर न देताच ग्रामस्थाला निराशा करत सरपंचांनी ग्रामसभेतून पळ काढला, यावेळी किशोर चव्हाण, गोरख चव्हाण, कृष्णा अण्णा पवार, एस के कारके, आभय चव्हाण, बंडू नाना पवार, दत्ता भाऊ वाघमारे, गणेश पवार, कल्याण चव्हाण, राजाराम यमगर, नारायण चव्हाण, विशाल पांढरे,अभय पांढरे, नितीन पवार, गोपाल चव्हाण, रामदास मस्के,शरद चांभारे, जयप्रकाश चव्हाण,संजय चव्हाण,करण यमगर, दादा वाघमारे, रामेश्वर चव्हाण, गणेश भिकारी, राजेंद्र महाराज,भरत चव्हाण, रसुल शेख,रवि चव्हाण,सुरेश पांढरे,बाळाभाऊ पवार,भागवत ढोरमारे, कृष्णा चव्हाण, आदी उपस्थित होते यावेळी तलवाडा पोलीस स्टेशनचे जातेगाव बीट जमादार हरीभाऊ बागर, सोनवणे साहेब यांनी ग्रामा सभा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले