तळणेवाडी येथे शिवराजे गणेश मंडळाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

17

🔹चिमुकल्यांनी विविध गीतांवर ठेका धरत जिंकली उपस्थितांची मने

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.19सप्टेंबर):- तालुक्यातील तळणेवाडी येथे शिवराजे गणेश मंडळाच्या वतीने शनिवार दि.१७ आणि रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांचे मने जिंकत उपस्थितांची दाद मिळवून सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सरपंच शिवाजीराव शिंगाडे,उपसरपंच चंद्रकांत धस, से.स. सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ धस, व्हा चेअरमन रामलाल धस, सुंदर धस, संतोष रायते, पत्रकार विनोद पौळ, विनायक उबाळे, पत्रकार तुकाराम धस,अमिन शेख, सामाजिक कार्यकर्ते आशिष कापसे, शितल साखरे, विक्रम भोसले, डॉ.सुहास धस, भानुदास कदम, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष दिपक धस, प्रकाश धस, विनोद भिल्लारे, आभिमान्यू धस यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वै.निगमानंद महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तर सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी मोरया मोरया गणपती बप्पा मोरया, देश रंगीला रे देश रंगीला…,ले जा.ले जा.., राज आलं राज आलं र जिंकुनी, संदेशे आते है.., आधीर मन झाले यासह अदि देशभक्तीपर गीत तसेच हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन शरद धस यांनी तर गणेश मंडळास पत्रकार तुकाराम धस, सुंदर धस, लहु शिंदे, सुग्रीव शिंदे, अंकुश शिंदे, धुराजी धस, महादेव धस यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाराजी कदम, नितेश खरसाडे, अमर धस, सिध्देश्वर झेंडे, शुभम धस, दत्ता काटकर,विशाल चव्हाण, अमोल शिंदे, अविनाश शिंदे यांच्या सह शिवनेरी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर माऊली मंडपचे मालक बाळराजे जाधव यांनी डेकोरेशनची उत्कृष्ट कामगिरी बजावली. कार्यक्रमास परिसरातील महिला, पुरुष, युवक मित्र व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.