

क्षीतीजाच्या पलीकडे असेल का असं गावं,
जिथे फक्त एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी माणसं असतील.
कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त मन जपणारी.
ते जमलं फक्त तथागतांना.
आपल्या सर्वस्वाची भेट दिली ,
जिथे समता , स्वातंत्र्य , बंधुता नांदेल, अशा विचारांची पेरणी केली.
त्या तशा गावाकडची मला ओढ लागली……
वाटतं छिन्न भिन्न झालेल्या घरट्यांना निवारा द्यावा,
तुटलेल्या मनाला आधार द्यावा.
सगळ्या असाह्य ,अगतिकतेला सामावून घ्यावं,
धरती जशी सामावून घेते, ज्वालामुखी ला अगदी तसं….
वाटतं मन इतकं मोठं व्हावं,
जिथे सर्वाच्या दु:खाचे सांत्वन व्हावं,
एवढी क्षमता यावी,
सर्व असाह्यतेला सामावून घ्यावी.
सर्व विषमता नष्ट व्हावी,
ना असावा इथे धर्म आणि जात..,
ना असावं इथे पुरुष अन् महिला.
ना असावा इथे दमन अन् शोषन
फक्त एक जात मानवतेची असावी ,
फक्त मानवतेची.
जिथे फक्त मानवता जपली जावी.
मला अशा गावाकडची ओढ लागली ,ओढ लागली ………..
✒️सुनिता टेंभूर्णे(तुमसर,भंडारा)