सोलापूर सांगोला रस्त्याची चौकशी न झाल्यास नॅशनल रस्त्याचे अधिकारी यांच्या तोंडाला काळापासून गाढवावरून धिंड काढणार : राजकुमार स्वामी

18

🔹यावेळी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.22सप्टेंबर):- सोलापूर – मंगळवेढा नॅशनल हायवे क्रमांक 166 हे रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे सोलापूर ते सांगली हे नवीन रस्ता बनवून काही महिने झाले तरी सदरच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे रस्ता मध्ये चिरलेला आहे तसेच नवीन बनवण्यात आलेल्या काही रस्त्याची आतापासूनच शिलाईचे काम सुद्धा संबंधित ठेकेदार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सदरच्या रस्त्याचे गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सदरचा रस्ता हे किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे…. सोलापूर मंगळवेढा या रस्त्यावर अनेक गोरगरीब नागरिक आपल्या दुचाकीने ये जा करीत असतात अशा प्रसंगात खड्डा चुकत असताना अनेक नागरिकांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू होत आहे याकडे प्रशासनाला पाहण्यासाठी वेळ नाही…

नॅशनल हायवे चे अधिकारी सुहास चिटणीस यांना याबाबत गेल्या एक महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून त्या पत्रावर उत्तर मिळत नाही संबंधित ठेकेदाराची चौकशी होत नाही रस्त्याचा ऑडिट होत नाही रस्त्याची गुणवत्ता तपासली जात नाही सदरच्या मागण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येत नसल्याने सदरचा नवीन रस्ता नागरिकांच्या जीवावरच उठला आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका प्रमुख राजकुमार स्वामी आणि नवनाथ शिरसटकर यांनी चक्क गाढवावर बसून जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात येत आहे… येत्या आठ दिवसात सोलापूर ते सांगोला या सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्याची चौकशी करून कारवाई न झाल्यास आठ दिवसानंतर नॅशनल हायवे चे अधिकारी सुहास चिटणीस यांना त्यांचा तोंड काळा करून त्यांची गाढवावरून सोलापूर ते मंगळवेढा धिंड प्रहार काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तालुकाप्रमुख राजकुमार स्वामी यांनी दिला आहे….