“लेख भारती” लेखसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन

    86

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(7 जुुुलै):- पाऊलखुुुणा या व्हाट्सअप्प समुहात दिनांक 6जुलै 2020 रोजी सायंकाळी आठ वाजता सौ. भारती सावंत लिखित आणि पाऊलखुणा पब्लिकेशन द्वारा प्रकाशित लेखभारती लेखसंग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला मा.अभिजीत राऊत सर प्रमुख अतिथि म्हणून लाभले.त्यांनी आपल्या मनोगतात सौ.भारती सावंत यांना दुसऱ्या लेखबुकाचेही प्रकाशन व्हावे अशी आशा व्यक्त केली आहे. ई बुक बनवणाऱ्या पाऊलखुणाचे प्रशासक मा.खाजाभाई बागवान यांनी उत्तम प्रकारे सुत्रसंचालन करून कार्यक्रमाचा नि साहित्यिकांचा उत्साह दुणावला.

      पाऊलखुणामधील कवयित्री सौ.छाया पाटील, हेमा जाधव, सौ.सुजाता निंबाळकर,सौ.प्रतिभा विभूते,माधूरी चौधरी,संध्याराणी कोल्हे, शबान मुल्ला,सौ.शुभांगी,सौ.मनिषा नंदाने,सौ कल्पना देशमुख,अॅड. योगिता तसे कविवर्य उदय पारेकर, काजळेसर,सुर्वेसर,अशोक कांबळे सर यांनी उपस्थिती दाखवून सौ.भारती सावंत यांना पुढील लिखाणासाठी अभिष्ट चिंतन केले. या ऑनलाईन सोहळ्याचे सूत्रसंचालन समूहाचे प्रशासक खाजाभाई बागवान यांनी केले तर लेखिका सौ. भारती सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.