अशोक तुकाराम जेठेवाड यांचे दुःखद निधन

30

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.23सप्टेंबर):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडावाडी ता. नायगाव (खै.) जि. नांदेड येथे कार्यरत असलेले सहशिक्षक अशोक तुकाराम जेठेवाड यांचे नांदेड येथे दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 48 वर्ष होते.विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. नायगाव पंचायत समितीने त्यांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी यश नगरी युनिट दोनच्या बाजूला असलेले यशश्री नगर ते मोरचौक , गोवर्धनघाट मार्गे निघणार आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,मुले असा परिवार आहे.