मोदी सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना सहज घेता यावा यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करावे : केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी

31

🔹केंद्र शासनाच्या सर्वस्पर्शी योजनांची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी या दृष्टीने राज्य सरकार प्राधान्याने कार्यवाही करेल: सुधीर मुनगंटीवार

🔸श्री हरदीपसिंग पुरी यांनी सहकार , उद्योग क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांशी साधला संवाद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23सप्टेंबर):- सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या मोदी सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना सहज घेता यावा यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करावे. गरीब कल्याण योजनांपासून तर महिला , युवा वर्ग , शेतकरी , उद्योजक , सहकार क्षेत्र आदी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आहे.आता राज्यात देखील भाजपचे सरकार आहे त्यामुळे या योजनांचे कार्यान्वयन जलदगतीने होईल , असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. केंद्र शासनाच्या सर्वस्पर्शी योजनांची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी या दृष्टीने राज्य सरकार प्राधान्याने कार्यवाही करेल अशी ग्वाही वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दि. 22 सप्टेंबर रोजी हॉटेल एनडी चंद्रपूर येथे केंद्रीय मंत्री श्री हरदीपसिंग पुरी यांनी सहकार , उद्योग क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहिर , आ. संजीव रेड्डी , डॉ संदीप धुर्वे , भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ,डॉ उपेंद्र कोठेकर , राजेश बकाने , डॉ मंगेश गुलवाडे यांची उपस्थिती होती.यावेळी श्री पुरी यांनी केंद्राच्या विविध योजनांबाबत विस्तृत माहिती दिली.उपस्थितांनी प्रश्न देखील विचारले. प्रामुख्याने आवास योजनेबाबत उपस्थितांनी प्रश्न विचारले व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे श्री पुरी यांनी दिली.

चंद्रपूर येथे रिफायनरी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगत श्री पुरी यांनी कोळसा , रेल्वे तसेच वन , पर्यावरण विभागाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक आपण प्रयत्नपूर्वक करू .यात वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार देखील प्रयत्नशील असतात. राज्याशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक श्री मुनगंटीवार करतील असेही श्री पुरी म्हणाले.यावेळी बांबूपासून तयार केलेला राष्ट्रध्वज देत श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले.