“शाक्त शिवराज्याभिषेक दिन “व ” १५० वा सत्यशोधक समाज स्थापना दिन” या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शि0बिराचे आयोजन !….

27

🔸रक्तदान हेच जीवनदान – सत्यशोधक विचार मंच

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.23सप्टेंबर):- धरणगाव शहरातील व परिसरातील शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने दिनांक २४ सप्टेंबर , २०२२ शनिवार रोजी वेळ सकाळी ९ वा. ते दूपारी १ वाजेपर्यंत माळी समाज व पाटील समाज मढी लहान माळीवाडा, धरणगाव येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करावे व आपल्या महापुरुषांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहन सत्यशोधक विचार मंच धरणगाव व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती धरणगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक गावातील सर्व सन्माननीय समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव आहेत. शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, इ. क्षेत्रातील सर्व संस्था व संघटना यांचे अनमोल सहकार्य आहे. तरी जास्तीत जास्त बांधवांनी रक्तदान करावयाचे आहे.