राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत पालक सभा संपन्न

22

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.23सप्टेंबर):-येथील श्री गुरुदेव गोरोबा स्मारक समिती संचालित राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवी या वर्गाची सामूहिक पालक सभा दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आली होती.

या पालक सभेत ” विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे परस्पर नाते संबंध कसे असावेत या विषयी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून मागदर्शन करत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुलांच्या शैक्षणिक अडचणी करिता पालक व शिक्षक यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली.

चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या व शाळेतील घरातील किंवा इतर समस्यावर तोडगा कसा काढावा विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत,कष्ट करण्याची तयारी विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे .मुलांमध्ये उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्राविण्य मिळवण्यात मदत करावी म्हणजे वेळा वाया जाणार नाही.

विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केल्या जाणार नाही कोणालाही नैराश्य येणार नाही. पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांचे मित्र होऊन त्यांची आवड, कल जाणून घ्यावा. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष प्रीतीताई धामणकर यांनी अध्यक्ष भाषणातून बोलताना केले मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात अनेक पालकांनी प्रश्न उपस्थित करत आपल्या पाल्या विषयी व शैक्षणिक गुणवत्तेविषयी सूचना देण्यात आल्या तसेच पालकांच्या प्रत्येक सूचनेची नोंद ही करण्यात येत होती .काही पालकांनी बोलताना सांगितले तालुक्यातील पहिलीच मराठी शाळा जिथे पालक सभेचे आयोजन केले जातात.

विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या अडीअडचणी सोडवल्या जातात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे व त्यांच्या कला गुणांकडे विशेष लक्ष देण्याचे कार्य येथील शिक्षक वृंदांकडून केले जातात .
या पालक सभेमध्ये असंख्य पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामध्ये काही पालकांनी सुंदर मनोगत व्यक्त केले.

या पालक सभेत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रीतीताई धामणकर तर प्रमुख अतिथी रामदास काळकर सर व मुख्याध्यापक तकाराम सूर्यवंशी सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथि म्हणून पत्रकार शैलेश ताजवे ,देवानंद पुजारी, बोरकुंड सर ,सचिन खंदारे उपस्थित होते.

पालक सभा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कनकापुरे सर, भारती सर, राऊत सर, धामणकर सर, मोरे सर यांनी परिश्रम घेतले.