राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियानाच्या निमित्ताने महा एनजीओ फेडरेशन आयोजित आरोग्य तपासणी शिबीर !

20

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.24सप्टेंबर):- देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती निमित्त सेवा पंधरवडा आयोजन महा.एन.जी.ओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व शेखर भाऊ मुंदडा व चंद्रकांत दादा राठी यांच्या सहकार्याने व संकल्पनेतून महाराष्ट्रात 72 ठिकाणी सेवा शिबिर उपक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी व शासकीय विविध योजनांची जनजागृती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र राजेगाव तालुका केज जिल्हा बीड च्या वतीने प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राथमिक आरोग्य केंद्र राजेगाव येथील (वैद्यकीय अधिकारी) डॉ.रामेश्वर तांबडे, डॉ. अशोक मुंडे (वैद्यकीय अधिकारी) श्री बाळासाहेब मोराळे (औषध निर्माण अधिकारी) श्रीमती एल. भोसले (आरोग्य सेविका )
श्री किसनराव वरवडे ( आरोग्य सहाय्यक ) महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री सुधिरजी बिक्कड, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी सुधीर बिक्कड यांनी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ,प्रधानमंत्री जण औषधी योजना ,मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष , प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री रेल्वे सुरक्षा योजना ,महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजनेची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वरवडे यांनी केले.

————–

वर्षभर विविध सामाजिक उपक्रमाचे महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक क्षेत्रातील नामवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापक शेखर भाऊ मुंदडा आणि मार्गदर्शक चंद्रकांतजी राठी यांच्या मदतीने राज्यभरात विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीबांना मदत होईल असे नियोजन केले जाते. तसेच पर्यावरण पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जसं की बीजराखी महोत्सव, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, फटाके मुक्त दिवाळी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

– श्री बाजीराव ढाकणे
सामाजिक कार्यकर्ते तथा
समन्वयक, महाएनजिओ फेडरेशन,महाराष्ट्र राज्य
——