राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम-आरोग्य शिबीरात शेकडो रुग्णांची तपासणी

15

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.24सप्टेंबर):-मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी व लायन्स क्लब मिडटाऊनच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार दि. २२ सप्टेबर रोजी प्रारंभ झाला असून या आरोग्य शिबिरास राज्याचे माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दलजीत कौर जज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, दै. सत्याप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, नवल पोकर्णा सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आहे.

आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रूग्ण आले आहेत. रूग्ण व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, प्र. उपाध्यक्ष कमल कोठारी, बनारसीदास अग्रवाल, डॉ. लक्ष्मीकांत बजाज सह लायन्स क्लब मिडटाऊनचे पदाधिकारी शिबीर स्थळी तळ ठोकून आहेत.

आरोग्य शिबीरातील रूग्णांवर प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. प्रज्ञा गाडगीळ, डॉ.ऋता देव, डॉ. श्रेया गांधी, डॉ. चिन्मय चौधरी, डॉ. ऐरावती, डॉ. प्रज्ञा, डॉ. सोनम, फिजिओ थेरपिस्ट आशा चिटणीस, उर्मी शहा, डॉ. जल्पा बेंगाली सह तीस तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत.

आरोग्य शिबिरास राज्याचे माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दलजीत कौर जज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, दै. प्रजावाणी चे संपादक गोवर्धन बियाणी, दै. सत्याप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, डॉ. सरिता सोनाळे, डॉ. प्रदीप गायकवाड, नवल पोकर्णा सह विविध क्षेत्रातील अन्य मान्यवरांनीही भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबतचा हेतू, आतापर्यंत किती रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले, या शिबिराचा किती रुग्णांना लाभ झाला याबाबतची माहिती दिली. आरोग्य शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनातून करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याची मान्यवरांनी प्रसंशा केली आहे.

आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नियोजनात आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तसेच सिडकोच्या भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी शिबिरात स्वयंसेवकाची भूमिका निभावत आहेत. या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ होत आहे. हे आरोग्य शिबीर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तर त्यांच्या पालकात समाधान व्यक्त करणारे ठरले आहे.