गृहपाठ !

21

दुवा गृहपाठ
गुरु- शिष्यातला |
चाचपणी वाव
अध्यापनातला || 1

लगृहपाठ साधे
कार्य स्व मदत |
सर्जनशीलता
फुलवी जोमात || 2

ज्ञान शाळेतील
व्यवहारी येते |
शिक्षण ,कौशल्यविकसित होते || 3

वर्ग अध्यापन
चाले समूहात |
घरचा सराव
आपल्या हातात || 4

शिक्षका शिवाय
स्वतंत्र अभ्यास |
ज्ञान दृढ करी
गृहपाठ खास || 5

वर्गातील ज्ञान
साधे अल्प स्मृती |
घरचा अभ्यास
दीर्घ राही स्मृती || 6

भान जिम्मेदारी
वेळ नियोजन |
ज्ञान संकलित

स्व लय- गतीनं || 7
जीवनी सराव
अनन्य महत्व |
नित्य गृहकार्य

वाढावे ममत्व || 8
नाविन्य नि अल्प
स्वरुप असावे |
उत्साहात करु

विद्यार्थ्यां वाटावे || 9
प्रयोग करावा
सृष्टी निरखावी |
अवांतर वाचा

समस्या मिटावी || 10
तपासला जावा
दुरुस्ती करावी |
शिक्षक कृतीने

स्फुर्ती वाढवावी || 11
गृहपाठ बंदी
नाही गरजेची |
नित्य नवी आस
आहे सरावाची || 12

✒️सुधीर शेरे(सरस्वती सेकंडरी स्कूल,म. गांधी मार्ग ,नौपाडा,
ठाणे. जि. ठाणे.मो. 9167005076
दि.21.9.22
आसनगाव.
💐💐💐💐💐💐💐