माझे अज्ञान विज्ञानाने दूर करा!

35

आज प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल,स्मार्टफोन आहे.गरीब असो की श्रीमंत, असंघटित कामगार,असो की संघटित कामगार,कर्मचारी अधिकारी प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे तो मोबाईल घेऊन वापरतो.घरात कॉम्प्युटर, वायफाय, 3 जी,4 जी च्या पुढे दररोज वेगाने जात आहे. तरी स्मार्टफोन व कॉम्प्युटरच्या स्किनवर देवादेवीच्या फोटोची छबी ठेवतोच. नेटवर्क नसेल तर स्मार्टफोनच्या स्किनवरील देव,देवी काहीच करू शकत नाही. नेटवर्क फुल आहे आणि रिचार्ज केला नसेल तर? देव, देवी काई चमत्कार करून मार्ग काढू शकतो काय?.तर बिलकुल नाही. कारण नेटवर्क, स्मार्टफोन कॉम्प्युटर,हार्डवेअर,सोफ्टवेअर हे विज्ञान आहे.माणसांच्या जीवनातील दररोजच्या घडामोडींचा बारकाईने विचार केला तर अज्ञान विज्ञानाने दूर होऊ शकते.अंधश्रद्धा,अज्ञान नष्ट करण्यासाठी विज्ञान जवळ करा. देवाधिकावर, देवीमातावर किंवा कोणत्याही धर्माचा अवमान करणे, कोणाच्या धार्मिक भावना दुखावने हा लेखाचा उद्धेश नाही.तर माझे अज्ञान विज्ञानाने दूर करा हेच सांगण्याचा मुख्य उद्धेश आहे.

भारत अनेक ऋषीमुनी, महापुरुष, महामानव,संत महंतासह तेहतीस कोटी देवांचा देश आहे. 33 कोटी देवापैकी एका ही देवाचे संपूर्ण नाव सांगता येत नाही. जन्म, शिक्षण,गांव, तालुका, जिल्हा, राज्य कोणते हे कोणीच विचारू शकत नाही. भारतीय जनतेला ते विचारण्याचा अधिकार नाही. ज्याने विचारण्याचा प्रयत्न केला तर तो नास्तिक,देशद्रोही, समाजकंटक ठरतो.प्राथमिक,माध्यमिक शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेतांना विद्यार्थी समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, भौतिकशास्त्र, विज्ञानशास्त्र, आर्ट, कॉमर्स, सायन्स अनेक विषयात पदवीधर होऊ बाहेर पडतात. पदवीधर प्रमाण पत्र,एस एस सी, एच एस सी गुणपत्रिका दाखवून नोकरी मिळवितात. नंतर सत्यनारायण महापूजा घालुन किंवा शिर्डी, शेंगाव, कोल्हापूर,कोणत्याही देवस्थानाला नवस फेडून आभार मानतात. परंतु अज्ञानावर मात करून शिक्षण हे वाघिणीचे दूध प्राशन केले. विज्ञान वापरून अज्ञानावर मात केली असे कोणी म्हणत नाही. कपड्याचा शोध मानवाने लावला त्या अगोदर तो झाड़पाला अंगाला बांधून राहत होता. झाडपाला खाऊन उदरनिर्वाह करीत असे, मग मानवाच्या अगोदर असलेल्या देवांकडे एवढे भरजरी कपड़े व मिठाई कसे, कुठून मिळत होते?. असा प्रश्न शंभर टक्के सुशिक्षित वर्गाला कधीच का पडत नाही.

आपल्या देशात अतिरेकी येऊन बॉम्बब्लास्ट करुन जातात देव त्यांना का अडवत नाही ?. उलटपक्षी मंदिरातच बॉम्ब ठेवून जातात ते कसे?. मंदिरांच्या सुरक्षेसाठी लाखो पोलिसांचा बंदोबस्त का ठेवला जातो? देव स्वत:चे रक्षण करू शकत नाही तर भक्तांचे कसे करणार ?. देव दर्शनासाठी पायपीट करणाऱ्या उच्चशिक्षित वर्गाला असा प्रश्न का पडत नाही?. सर्व देवानी भारतातच जन्म का घेतला इतर देशांत एकही देव जन्माला का नाही आला?.संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेणारे देवांचे ते पुष्पक विमान कुठे गेले ज्या मध्ये बसून ते नेहमी पृथ्वीवर यायचे आता का ते येत नाहीत?. विमानाचा शोध राइट बंधुनी लावला हे महाविद्यालयात शिकविले जाते. त्या अगोदर भारतात महाराष्ट्र राज्यातील देऊ,आळंदी, पुणे जिल्ह्यात तयार झाले होते. हे समाज मनावर बिनबोभाट कोरल्या जाते.

वाघ, सिंह, उंदीर, डुकरं, कुत्रा, गाय, बैल, म्हैस, रेडा अशी अनेक प्राणी देवा देवीची वाहने होती. त्यांच्या दगडी, मूर्तीची, चांदी, सोन्याची मूर्तीची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. परंतु जिवंत प्राण्यांची जनावरांची पूजा अर्चा केली जात नाही. खंडोबा जर देव आहे आणि कुत्रा जर खंडोबाचा अवतार आहे तर कुत्रे चावल्यावर लोक इंजेक्शन का घेतात उलटपक्षी देव चावला देव चावला म्हणत पेढ़े का वाटत नाहीत? खेड्यातील अशिक्षित लोकांना असे प्रश्न पडणार नाहीत, पण उच्चशिक्षित वर्गाला असे प्रश्न का पडत नाही? हे उच्चशिक्षित लोक अशिक्षित, अज्ञानी अंधश्रद्धा असलेल्या लोकांचे अज्ञान विज्ञानाने दूर का करीत नाही. विज्ञान झपाट्याने पुढे जात असतांना आपण मागे का पडतो? आपल्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताची सुरक्षा देव का घेत नाही? जर मुहूर्त नक्षत्र 36 गुण पत्रिका बघुन लग्न केल्यावर नवरा बायकोचा घटस्पोट भांडनाणे का होतात? बहुतेक लोकांना पाप, पुण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. स्वर्ग नरक कोणी पाहून रिटर्न आलाय का? मग स्वर्ग असा नरक असा हे हुबेहुब कसे पुस्तकात लिहल्या जाते? बहुसंख्येने लोक म्हणतात लिहलेले खोटे असूच शकत नाही.

गोरगरिबांना दुःख मुक्त करून स्वतः ऐश आराम करणारे अशिक्षित अज्ञानी लोकांना शाप देण्याची धमकी देणारे बाबा, महाराज, संत आता देशातील वेगवेगळ्या जेल मध्ये शिक्षा भोगत आहेत. त्या काळी हवे तेव्हा जमिनीवर येणारे देव, कोणालाही शाप देऊन भस्म करणारे आता तसे का नाही करत? त्यांची पॉवर विज्ञानामुुळे संपली आहे.विज्ञानाच्या समोर अज्ञान जास्त वेळ टिकत नाही. 33 कोटी देवांच्या आरत्या पुजा विधी करणाऱ्या शेतकऱ्यांना गळफास लाऊन आत्महत्या का करावी लागते?

भारतातील अनेक राज्यात प्रचंड जागृत देवस्थाने आहेत. त्यांची म्हणती माऊथ टू माऊथ होत असते. लालबागचा गणपती बाप्पा राज्यात नव्हे तर देशा विदेशात प्रसिध्द आहे. तिथे भक्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्था करावी लागते. त्याचं बरोबर हे आवर्जून सांगितले जाते.आणि भितीवर लिहलेले असते मंदीरांमध्ये खिसेकापू पासून सावध रहावे. म्हणूनच ३३ कोटी देव संरक्षणासाठी असताना सुध्दा देशात हजारो कोटी रुपये सुरक्षा यंत्रणा राबविण्यासाठी खर्च का केले जातात?. तरी आपल्या देशात अज्ञान अंधश्रद्धा विज्ञानावर वरचढ आहे. गोरगरिबांना देवांची, धर्माची भिती दाखवून आर्थिक शोषण करणारे उच्चशिक्षित किंवा उच्चवर्णीय असतात.उच्चशिक्षित देशाचा राष्ट्रपती झाला तरी त्यांचा वर्ण विसरला जात नाही. तसेच उच्चशिक्षित देशाचा सरन्यायाधीश झाला तरी तो आपला धर्म विसरू शकत नाही. देशाचे सर्वोच्च सरन्यायाधिश दगडाच्या धातूच्या निर्जीव मूर्त्यां समोर लोटांगण घालत असेल तर बहुसंख्य लोकांनी त्यांच्या कडून कोणता आदर्श घ्यावा ?.
कस होईल आपल्या भारत देशाच! उच्चशिक्षित न्याय निवाडा करणारा सर्व लोकांणा न्याय देणारा न्यायमूर्तिच जऱ निर्जीव मूर्त्यां झोपुन समोर स्वताच शरीर जमिनीवर झोपवतो आणि पूजा करत असेल तर बहुुसंख्य लोकांत अशिक्षित, अज्ञानी अंधश्रद्धा वाढविल की कमी होईल? स्रिया कधी कधी देवीचं रूप असतात,त्यांची कडक उपासना केली की त्या प्रसन्ना होतात आणि संकटातून वाचवतात त्यामुळेच आपल्या देशात स्रिया देवाची देवीची पुजा, व्रतवैकल्ये सर्वात जास्त लहानपणा पासून करतात, तरी लैंगिक अत्याचार त्यांच्यावरच का केला जातो? सुशिक्षित महिलांना असा प्रश्न कधी पडत नाही.

उच्चशिक्षित म्हणून त्या विज्ञानाच्या सर्व तत्वज्ञानांचा कॉम्प्युटर, स्मार्टफोनचा नेटवर्किंगचा वापर करून सर्व साधनांचा उपयोग घेतात. शिक्षणाची यांची देवी सरस्वती, यांना चांगली नोकरी मिळाली म्हणूनच चांगला पगार मिळतो,तर म्हणतात लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न आहे. नवरात्र उत्सवात सर्व सुशिक्षित, उच्चशिक्षित महिला नऊ दिवसात नवंरंगाची, साज शृंगारांची, सौभाग्यवतीचे उधळण करतात. आता देशात समाजात महिलांना जो मानसन्मान मिळतो. तो कोणामुळे हे पूर्णपणे विसरतात. त्यांनाही हेच सांगणे अज्ञान विज्ञानाने दूर करा. सत्य स्वीकार आणि आचरणात आना.

अंधश्रद्धा आणि अज्ञान हे सर्वच स्तरावर आहे, त्यात अशिक्षित पेक्षा सुशिक्षित जास्त आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देतांना त्यांचा वापर जास्त होतांना दिसत आहे. त्यांचा परिणाम सर्वसामान्य माणसावर होत आहे.सर्व सामान्य लोकांना देव कोप पावला असे सांगून घाबरविले जाते मग देवाचे नारळ हार पेढ़े मागच्या दाराने पुनः दुकानात नेणारे देवाला दिसत नाहीत का?. देवळात दानधर्म कोणाला केला जातो? यांचा विचार उच्चशिक्षित, कॉम्प्युटर स्मार्टफोन, नेटवर्किंग करणाऱ्यांना कधीच करावा असे का वाटत नाही.अज्ञानाला कुलूप असते,ते विचारांची किल्ली असली तर खोलता येते. विज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर, स्मार्टफोन प्रत्येकाला पासवर्ड असतो. तरच तो ओपन होतो. माणसांच्या मेंदूत व मनात जे लहान पणा पासुन भरले ते खाली केल्या शिवाय दुसरे बसणार नाही. अज्ञान अंधश्रद्धा एकाएकी निघणार नाही,पण उच्चशिक्षित लोकांनी मोबाईल, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्किंग वापरून अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच अज्ञान विज्ञानाने दूर करा…

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई)मो:-9920403859