रमेश राठोड यांना आर.जी.भानारकर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

31

🔸महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25सप्टेंबर):- महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समिती शाखा जिवतीने आयोजित केलेल्या मासिक सभेत महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे ,जिल्हाकोष्याध्यक्ष सुनील कोहपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी पुरोगामी संघटनेतर्फे दिला जाणारा जिल्हा अधिवेशनातील आर.जी.भानारकर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार रमेश राठोड यांना २४ सप्टेंबर ला प्रदान करण्यात आला.

सभेमध्ये पुरस्कार वितरण तसेच अनेक विषयावर चर्चा करून दुय्यम सेवा पुस्तक अद्यावत करण्यासाठी केंद्रनिहाय शिबिर लावणे ,माहे मे २०२२ पासून आजपर्यंत पगारातून झालेल्य कपाती व एलआयसी अजूनही खात्यावर जमा न झाल्याबाबत ,इन्कम टॅक्स टीडीएस कपात होऊनही दंड बसला आहे त्यामुळे सीए कडून काम काढून घेण्याबाबत ,विनोद आगलावे यांची सेवा पुस्तकावर रुजू नोंद नसल्याबाबत , पाटण व सेनगाव केंद्राचे लिपिक बोरकर यांच्याकडील काम पेंडिंग असल्याबाबत ,जिल्हा परिषद मधून बिल मंजूर होऊनही सुनिता कोंडेकर यांचे बिल अप्राप्त असल्याबाबत ,इन्कम टॅक्स फॉर्म नंबर १६ अप्राप्त असल्याबाबत, आधीच्या संवर्ग विकास अधिकारी यांच्या काळातील फार्म नंबर १६ व गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करीत नसल्याबाबत ,सेवा पुस्तकावर चेकलिस्ट जोडण्याबाबत , शाळा स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतने मदत करण्याबाबत , सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत शिक्षकांच्या वैयक्तिक समस्येसाठी त्रैमासिक समस्या निवारण सभा आयोजित करण्याबाबत , कार्यपूर्ती अहवाल मिळण्याबाबत सविस्तर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले.

याप्रसंगी अल्काताई ठाकरे , जिल्हाकोष्यध्यक्ष सुनील कोहपरे , तालुकाध्यक्ष रोहिदास राठोड , सरचिटणीस लिंगोराव सोयाम , महिला अध्यक्ष कलावती वानखेडे , वर्षा राठोड , लीना चांदेकर , निता कोंडेकर ,डी एम राठोड , योगराज बोरकुटे , राहुल गंधारे , डी आयतवाड , रमेश राठोड , एस.एस मेश्राम , व्ही एन आगलावे , भाऊराव बोंडे , सुरेश येरकरी . विनायक फुकट , पी.डी कंठाळे या सर्व संघटनेच्या शिलेदारांनी पूर्णवेळ उपस्थित राहून सभा संपन्न केली.