येनस मध्ये गुरांचे 95 टक्के लसीकरण पूर्ण गावातील नागरीकांचा चांगला प्रतिसाद

30

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.25सप्टेंबर):-संपुर्ण अमरावती जिल्ह्यातील नवे तर संपुर्ण महाराष्ट्रात गुरांचा कर्दनकाळ ठरत असलेला लंपी आजार हा सर्वत्र पसरला आहे यात अनेक जनावरांना त्याची लागन झाली आहे .या लंपी आजारामुळे शेतकरी त्रस्त झालेले असतांना महाराष्ट्र शासनाने गुरांचे लसीकरण चा कार्यक्रम हाती घेत सर्व गुरांचे लसीकरण करण्याचे पत्रक महाराष्ट्र शासनाने काढते वेळी हि मोहीम मात्र आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध आहेत की नाही याचा विचार केला गेल्या नाही.सपुर्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जवळ पास 75टक्के लसीकरण झाल्याचे बोलल्या जात आहे.

तसेच आज दिनांक 25/9/2022रोजी येनस गावांमध्ये 95 टक्के लसीकरण झाले असुन येनस गावातील नागरीक केशव भस्मे.रूपेश भुरे.विनोद देशमुख.बापुराव वैध.प्रेमांशु रघुते.राजु ईटणकर.तसेच येनस गावातील पोलीस पाटिल योगेश फुके यांनी.लसीकरण करणारे कर्मचारी वसंत राठोड यांना चांगल्या प्रकारे मार्ग दर्शन करुण हजारो गुरांचे लसीकरण करण्यात आले तसेच उर्वरीत जनावरांचा शोध घेवुन त्याचे लसीकरण सुरु आहे.नादगाव खडेश्वर तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी.डाॅ.मेश्राम साहेब विस्तार. पशुवैद्यकीय अधिकारी ना.ख.डाॅ.खेरडे साहेब .यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत राठोड.तसेच .रुषीकेश गाडगे पशुसेवक.रोशन भातुलकर.याच्या कार्यामुळे शेतकरी यांनी सर्वांचे कैतुक केले.