राज्यस्तरीय रोप स्कीपिंग स्पर्धेत क्रांतीवीर शाळेच्या विध्यार्थ्याचे उजवल यश;सर्व स्तरातून होतेय अभिनंदन

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.26सप्टेंबर):-नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत सातारा जिल्हा संघात सहभागी झालेल्या क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील खेळाडू नी उज्वल यश संपादन केले.महाराष्ट्र राज्य हौसी रोप स्किपिंग असोसिएशन तर्फे पाचवी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथे भिन्न वयोगटानुसार संपन्न झाली.या राज्यस्तरीय स्पर्धेत क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हस्वड .मधील संस्कृती ढाले,सनया गांधी,सौजन्य डमकले ,अनुष्का खुस्पे यां खेळाडूंनी सुवर्णपदक, तर शिवश्री शेटे हिने रौप्य पदक पटकाविले.या बरोबरच क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवड मधील खेळाडू प्रणया जाधव ,व श्रावणी काटकर हिने सुवर्णपदक पटकविले.

राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत यशवंत ठरलेल्या खेळाडूंच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली येथे होणार आहेत. यानिमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील खेळाडूंनी बौद्धिक प्रगतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा अधोरेखित केलेला आहे.क्रीडाशिक्षक चंद्रकांत तोरणे, तुकाराम घाडगे,वैशाली दहिवडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अध्यक्ष तसेच सातारा जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशनचे अध्यक्ष ,कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर,
संस्था सचिव सुलोचना बाबर,,प्राचार्य राहुल फुटाणे ,क्रांतिवीर शिक्षण संकुलातील शिक्षक, पालक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.