पोलीस स्टेशन व वसाहतीचे लोकार्पण त्वरित करा

27

🔸दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ (अधिकृत) चे गृहमंत्र्यांना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 26 सप्टेंबर):-शहरात मागील सहा महिन्यापासून पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत इमारतीचे काम पूर्ण झाले असून सुसज्ज इमारत अद्यापही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

सदर वास्तूचे लोकार्पण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे अशा आशयाचे निवेदन दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ अधिकृत कडून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले.सदर वास्तूमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभागीय वाहतूक शाखा व पोलीस स्टेशन असे तीन अत्यंत उपयुक्त कार्यालय एकाच ठिकाणी राहणार असणार अशी माहिती आहे.

यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासासाठी व पोलीस बांधवांच्या निवासासाठी पोलीस स्टेशन परिसरातच सुसज्ज वसाहत निर्माण झालेली आहे. सदर इमारतीचे लोकार्पण झाल्यास नागरिकांना आपली कामे करण्यास सुकर होईल.तरी आपण सदर निवेदनाची त्वरित दखल घेऊन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण विनाविलंब करावे अश्या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अझहरउल्ला खान , सचिव प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार, वसंतराव देशमुख, सलमान अशहर खान, अविनाश मुन्नरवार, शैलेश ताजवे, निळकंठ धोबे, अंकुश पानपट्टे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

[विशेष बाब म्हणून पोलीस इमारत मंजूर]

उमरखेड येथील नगर परिषद ब वर्ग असल्याने शहरातील बांधकाम चार मजली होऊ शकते परंतु पोलीस वसाहतीची इमारत विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली असून सहा मजली सुसज्ज इमारत तयार झाली आहे सर्व सोयी सुविधा युक्त असलेल्या या प्रशासकीय इमारतीचे व वसाहतीचे लोकार्पण अनेक दिवसांपासून रखडले आहे.