बाबूजी धीरे चलना,बडे धोके है इस राह में !

33

जळगाव शहरातील प्रभाग १३ रायसोनी नगर मधे मंगला बारी यांनी आधार कार्ड व मतदान कार्ड लिंक करण्याचे शिबीर आयोजित केले आहे.त्याचे उद्घाटन श्री विष्णू भंगाळे, श्री गजानन मालपुरे , श्री शिवराम पाटील,श्री ईश्वर मोरे श्री राकेश वाघ यांनी केले.ते शिबीर आजपासून तीन दिवस ११ते ५ चालेल.रायसोनी नगर मेन सिटीपासून खूप लांब आहे.येता जातांना रीक्षाचे १५० भाडे लागते.तितक्याच पैशात रायसोनी नगर मधे ही सुविधा उपलब्ध करून दिली.म्हणून शिवराम पाटील यांनी मंगला बारी यांचे कौतुक केले.बाया माणसांनी याचा लाभ घ्यावा.पैसा व वेळ वाचवावा.ही नवरात्र निमीत्ताने येथील प्रभाग मधील पुरूष व महिलांना चांगली भेट आहे.शिवराम पाटील यांनी सुद्धा फक्त १५०रुपयात आधार कार्ड अपडेट केले, मतदान कार्ड शी लिंक केले.आता माझे मतदान परस्पर सरकार करन घेऊ शकते, त्यामुळे निश्चिंत झाल्याचे संकेत झाले.

तेथे असलेल्या एका नेत्याने सांगितले कि, मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक केले कि, तुम्ही मतदानाला नाही गेले तरी हे ईव्हीएम जादुगार असलेले सरकार परस्पर तुमचे मतदान ठोकू शकते.तुमचा अमुल्य वेळ वाचेलच.तुमच्या कानाला वारा ही लागणार नाही. तुमची दुपारची झोप मोडली जाणार नाही.शिवाय उच्चशिक्षित लोकांना अशिक्षीत मतदारांच्या लाईनीत उभे राहाण्याण्याची नामुष्की येणार नाही.

२०१८मधे जळगाव महापालिकेत ५०नगरसेवक निवडून येण्याची अपेक्षा असतांना भाजपचे ५७नगरसेवक निवडून आले होते.अर्थात ५७ पैकी २७ माकडछाप नगरसेवक नंतर टुणटुण उड्या मारत शिवसेनेत पळून गेले होते.म्हणे निधीही जास्त मिळतो,मार्जीन व टक्केवारीही जास्त मिळते. आताही रस्ता न बनवता, पुर्ण ८०नगरसेवक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडून आणू शकतील.जळगाव मधील मतदारांना पैसै देऊन,विनवणी करून,रीक्षा देऊन मतदानासाठी बोलवले जाते.पैसे देऊन चार वेळा नमस्कार करावा लागतो.

आता तसे करण्याची गरज पडणार नाही.शहरातील उच्चशिक्षित लोक, डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर वकील ,व्यापारी मतदानाला जात नाहीत.कारण इकडे धंद्यावर मार पडतो.आता तशी गरज पडणार नाही.मतदार मतदानाला नाही गेले तरी त्यांचे मतदान परस्पर करून घेता येईल.त्यामुळे भारत १००टक्के मतदान करणारा देश ठरणार आहे.याची नोंद गिनीज व लिम्का बुक मधे होऊ शकते.आताच ईव्हीएम मशीन मुळे मतदान वर संशय घेतला जातो.आता यापुढे संशयाला संधी राहाणार नाही.असे मत त्या नेत्याने व्यक्त केले.” बाबूजी धीरे चलना,बडे धोके है इस राहमें”

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव