संविधानिक जीवन मूल्यांना मान्यता देणार कोण?

18

भारत एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र आहे.त्यातील आम्हा सर्व जाती पंथ धर्म लिंग वंश यातील भेद नाकारून विविधतेचा आदर करून सार्वजनिक जीवनाचा आदर्श देणारे आपले संविधान आहे.यात आपापली स्वतन्त्र मते धार्मिक विचार,परंपरा याप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार व्यक्ती संघटना यांना आपले संविधान देते.तरीही या देशाचे नागरिक म्हणून इतरांचा आदर करून आपले जगणे अगदी कायद्याने कसे जगावे?.याचे दिशादर्शन आपले संविधान करते.म्हणूनच केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणेंनी अनधिकृत बांधकाम केले?

ते पाडण्यापासून देशविरोधी कारवाया करणाऱ्या “PFI “च्या लोकांवर धडक कारवाई सरकार करतेय.अर्थात संविधानिक मूल्ये माझ्यापेक्षा मोठी नाहीत, असे मानणारे राजकीय नेते, उद्योगपती,धर्मप्रमुख,बिल्डर,राजकीय पक्ष याना आपले सर्वोच्च न्यायालय तुम्ही सविधानापेक्षा मोठे नाहीत,हे अनेक निर्णयातून सांगत असते.अर्थात आमचे वकील, न्यायमूर्ती,राजकीय नेते पत्रकार पोलीस धार्मिक प्रवचनकार या सर्वशक्तिमान भारतीय सविधानापेक्षा आपापल्या देव,धर्म,प्रेषित,गुरू,बुवा बापू यांच्या महान शक्ती बद्दल बोलताना सविधानास अनुल्लेखाने मारतात.हा गुन्हा आहे ना?आपल्या देशात हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,शीख पारशी,जैन,बौद्ध अशा विविध धर्म पंथाच्या विचारांचे लोक राहतात.त्यामुळे मी या सर्वांबद्दल बोलतोय.हा देश हिंदू,इस्लामिक,ख्रिश्चन, बौद्ध राष्ट्र व्हावा या घोषणा असविधानिक आहेत.तर “भारत संविधानिक राष्ट्र व्हावे” असे म्हणणारे धर्म राजकीय पक्ष,संघटना हेच संविधान आहेत, हे आम्ही समजून घेतले पाहिजे.नव्या भारतात आमचे धर्म राजकीय पक्ष संघटना या संविधान विरोधी पायावर उभ्या असतील?.तर हा पाया उध्वस्त करावाच लागेल.

मग तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल? किंवा अलीकडेच सरकारी कारवाईचे लक्ष ठरलेली “PFI” ही संघटना असेल?.अर्थात “आमचे सरकार आहे?” म्हणून साऱ्या ईडी कारवाया विरोधीपक्ष आणि नेत्यावरच करायच्या?. हा “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच कार्ट” या महाराष्ट्रीयन मराठी म्हणीचा अर्थ गुजराती आणि इतर सर्व राज्यातील भाषांतून भाजपच्या केंद्रीय कार्यालयात भोंगे लावून सांगावा लागेल, की काय?अशी स्थिती आहे.अर्थात सकळ मराठी जणांचे नेते हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे उत्तम पद्धतीने हे राष्ट्रीय कार्य पार पाडतील.”सोनाराने कान टोचावे” ही मराठी म्हण (सीकेपी) ठाकरे ब्रँड साठी परफेकट ठरावी?.आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर मुबंईत ईडीला नक्कीच भिडले असते.

“पन्नास खोके एकदम ओके” हे भ्रष्ठ तत्वज्ञान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर खपविणारी शिंदे सेना आणि भाजप महाराष्ट्राचे नाव बदनाम करीत आहे.पेटी खोके हे गँगस्टर तत्वज्ञान खेड्या पाड्यात पोहचहून महाराष्ट्राचा गुजरात होऊ नये.?प्रामाणिक कष्टकरी श्रमिक महाराष्ट्राला बुद्ध महावीर यांची श्रमण परंपरा आहे. दुसऱ्यांच्या कष्ठावर जगणाऱ्या शोषक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही मनुस्मृती शोषक पद्धत मानवी श्रम कष्ठ यांना शूद्र ठरविते.हे असविधानिक तत्वज्ञान आहे.अर्थात कष्टकरी स्त्रिया,ओबीसी, एससी,एसटी यांचे तत्वज्ञान हे मागासवर्गीय असले तरीही ते संविधानिक आहे.तर भ्रष्ट मार्गाने मेहनत न करता मंदिरे मशिदी चर्च सर्वच धर्म येथील पुरोहितशाही, दुसऱ्यांना गुलाम करणारी सर्व धर्मीय तलवार अर्थात क्षत्रिय राजसत्ता? आणि लोकांना फसविणारा व्यापारी वर्ग यांच्यात प्रामाणिक पणा नसेल? तर या सर्वांना ईडी लागलीच पाहिजे.नोटबंदी ही काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आहे,हे जाहीर वक्तव्य आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.परंतु काळे पैसे कोणते? याची व्याख्या ना संसदेत ना विधानसभेत झाली.रिकामे झाले ते शेतकरी,कष्टकरी जगणारे शेतमजूर, कामगार मच्छीमार ! अर्थात 85 टक्के ओबीसी मागासवर्गीय,हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.सामान्य शेतमजूर कामगार यांच्या हातातील काम संपले आणि पैसेही संपले! याबद्दल तथाकथित अर्थतज्ञ शब्दाने बोलत नाहीत.माझ्या अनुभव क्षेत्रातील गावठाणे,कोळीवाडे,आदिवासी पाडे मुस्लिम वस्त्या यांत आलेली मंदी मी रोज पाहतो.यासाठी रोज पायी फिरतो.शेतमजूर स्त्रिया छोटे दुकानदार यांच्याशी बोलतो.मोदीपूर्व भारतीय बाजार (मुंबई शेयर बाजार नव्हे) अर्थात खेडी कोळीवाडा गावठाण यात अशी स्थिती कधी नव्हती.

देशाची आर्थिक स्थिती सण,उत्सव,शेयर बाजार,राजकीय घोडेबाजार यात मोजणारी भारतीय मीडिया,अर्थतद्न्य हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय मानसिकतेने विचार करतात!.याचे दुःख आता वाटत नाही.दुःख याचे आहे मनुस्मृती जाळनाऱ्या संविधान कार डॉ.बाबासाहेब आबेडकरानी आम्हाला नव्या सामाजिक न्यायाचे संविधान दिले.ते समोर ठेऊन देशातील उपेक्षित वंचित शोषित यांची गरिबी आम्ही पाहू शकत नसू?.तर आम्ही आंधळे झालोत का?.मोदींच्या लोकांना अंधभक्त म्हणूनचं आम्ही डोळस ठरत नाही?.आणि आमच्या गरीब जातबाधवांचे दुःख वेदना,गरिबी नष्ट होत नाही.

देशाची वाढती गरिबी म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एससी,एसटी यांची गरिबी ! ज्यांची संख्या 85 टक्के पेक्ष्या जास्त असावी.ती गरिबी कशी कमी करावी?. हा या लेखाचा विषय आहे.माझ्यासमोर असलेल्या या प्रश्नाचे उत्तर अर्थात ज्यांना आम्ही मागासवर्गीय का झालो हे माहीत आहे? मान्य आहे? अशा पत्रकार विचारवंत आणि संत गाडगेबाबा,पेरियार यांच्या सारख्या जीवनाच्या अनुभवात शहाणे झालेल्या लोकांनी द्यावे.भारतावर परक्या इंग्रज मोगल पोतूरगीज डच शक हुन या लोकांनी शासन केले.या शोषक राज्यकर्त्यात आणि मोदी शहा यांच्यात मला काही फरक वाटत नाही.प्राप्त परिस्थितीत देवासह कुण्या तारणहार शासकाची वाट न पाहता आमची मागासवर्गीय माऊली अर्थात आमची “आई” नेहमीच वाट काढते.अलीकडेच तिला शहाणी करण्यासाठी सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा अधिकार दिलाय.अर्थात तिचे व्यावहारिक शहाणपण मान्य करण्याइतके आम्ही स्वतंत्र झालेलो नाही.कोकणातल्या आगरी कोळी भंडारी कराडी गाबित कुणबी हुंडा नाकारणाऱ्या स्त्री प्रधान अर्थव्यवस्थेचा विचार हा मातृसत्ताक विचार आमच्या मासळी मार्केट मध्ये आजही आहे.

भारतीय संविधानात या स्त्रियांच्या न्यायाचा विचार प्रथम केलेला आहे. त्यानंतर ओबीसी एससी एसटी यांच्या सामाजिक आर्थिक न्यायाचा अर्थात आरक्षण हा त्या समतेच्या पायावरील दृश्य न्याय आहे.त्याला संपविण्याचा विडा उचलणारे आरक्षण मुक्त भारताचे, हिंदुराष्ट्र करणार असतील? त्याला विरोध करणारी इस्लामिक ख्रिशन जैन पारशी शीख बौद्ध ही “द्वि राष्ट्र तत्वज्ञान” क्रियेला प्रतिक्रिया,या निसर्ग विज्ञान नियमाने येणार? हा धोका आम्ही वेळीच ओळखला पाहिजे.म्हणूनच “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास,सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय,विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,दर्जाची व संधीची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमद्यें व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

“या संविधानिक प्रास्ताविकात सांगितलेल्या आमच्या वचन बद्ध विचारानुसार आमचे सर्व सार्वजनिक सण,उत्सव,जगणे यात संविधान विरोधी जे जे आहे ते टाळले पाहिजे.अर्थात संविधानिक जीवन मूल्ये जपणारे राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट,26 जानेवारी ज्या राष्ट्रीय संस्कृती नुसार साजरे करतो त्याच दिशेने गेले पाहिजे.

आमची गाणी,आमचे चित्रपट,साहित्य संगीत आणि नेतृत्व जिथे जिथे संविधानिक जगणे दिसेल त्याला मान्यता आणि सन्मान देणारे लोक पुढे आले पाहिजेत.याच तत्वाने बुद्ध छत्रपती शिवराय फुले आंबेडकर ही सविधानास अनुकल विचारसरणी आम्हीं मानली.याच विचारांचे अनेक नेते आम्हा स्त्री शूद्राती शूद्रांमध्ये आजही आहेत.त्यांना आम्ही पुढे आनुया.याच तत्वाने आम्ही लोकनेते दि बा पाटील हे ओबीसी नेतृत्व मुबंई परिसरात नवी मुबंई आंतराष्ट्रीय विमानतळावर नाव कोरून पुढे आणले.हा आदर्श सर्वच मागास जातींनी घ्यावा.

✒️राजाराम पाटील(मातृसत्ता विहार,केगाव(खारखंड)उरण,जिल्हा- रायगड)मो:-8286031463