✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी)

मो:-8888628986

ब्रह्मपुरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे जमीनी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत आहे, त्यांना शेतीचे कामासाठी मुक्त संचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या सदस्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, त्यातही ब्रह्मपुरी तालुक्यात याचा धोका अधिक वाढल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश काढून, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांना गडचिरोलीत प्रवेश करण्यास मज्जाव केला . या आदेशात ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेला गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये असेही ही आदेशित केले. ब्रह्मपुरी तालुक्याला गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात वास्तव करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेती गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेत आहे.

सध्या खरीप हंगाम चालू झाल्याने शेतकऱ्यांना दररोज शेतात काम करावे लागते मात्र जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशामुळे ब्रह्मपुरी येथील शेतकऱ्यांना गडचिरोली येथील शेती जाऊन काम करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष विनाशेतीने या शेतकऱ्यांना काढावे लागेल. त्यामुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर ही आणखी मोठी मोठे संकट कोसळणार आहे. आणि त्यामुळे तातडीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे कामासाठी गडचिरोलीच्या सीमेत जाऊन शेती करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अॅड. गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे यांना ई-मेल चे माध्यमातून निवेदन पाठवून मागणी केली आहे.

आदिवासी विकास, कृषिसंपदा, गडचिरोली, पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED