

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.28सप्टेंबर):-परभणी जिल्हयात गाय व म्हैस अशा एकूण पशुधानांची ४ लाख संख्या असून . गाय वर्गात गोमाता , कालवडी, बैल व गोरे अशा २९८८०० पशुधनाची संख्या सरकारी दप्तरी नोंद आहे. यामध्ये आजपर्यंत २३२००० पशु धनांना लम्पी आजारावर प्रभावी लस देण्यात आली असल्याची माहिती भारतीय किसान संघाच्या महिला प्रांत प्रमुख सौ. राजश्री जामगे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना माहीती दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की , डॉ. प्रकाश साबणे पशुधन विकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार इ.सन२०१९ ते२०२० मध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात आढळून आला होता. मानव जातीला कोरोना नंतर पशुधनावर आलेले हे मोठे संकट होते. या समयी सव्वा दोन लक्ष लसीकरणाचे डोस दिले गेले होते. आता हा बुस्टर टाईप डोस डॉ. पी.व्ही. नेवाडे जिल्हा पशु संवर्धन व डॉ. नामदेवराव आघाव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या ७८ पशुवैद्यकीय दवाखाने व राज्य सरकारचे ८ पशुवैद्यकिय दवाखाने असे एकूण ८६ पशुवैदकीय दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी, पशुधन पालक व विविध संघटना, सामाजीक संस्था यांच्या सहभागातून ५१ हजार ८०० पशुंना तर उर्वरित सरकारी यंत्रनेतून प्रतीबंधक लसीकरणाचे उदिष्ट ६५ टक्क्यांचे वर जावून पोहचले आहे. त्यामुळे या आजारांनी एकही पशुधन मृत्त्यू पावल्याची नोंद सरकारी दप्तरी झालेली नाही.
१७ सप्टेंबर मा . पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसी श्री दिगंबर काळे भारतीय किसान संघ परभणी जिल्हा पशुधन आयाम प्रमुख यांनी इळेगाव व कै . लक्ष्मीबाई जामगे यांच्या नावाने ओळखले जाणारे कौडगाव येथे लोकसहभागातून लसिकरणास सुरुवात करण्यात आली. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष श्री नामदेवराव बुचाले व जिल्हामंत्री श्री भगवाणराव खटिंग यांनी गाठ्यांची स्वच्छता कशी ठेवावी या बद्यलची माहिती दिली. मा. चंदन पाटील [संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य ], मा दादा लाड [ संघटन मंत्री महाराष्ट्र व गोवा राज्य ] भारतीय किसान संघ Youtube Live, Facebook Live, Online media, डॉ. गटने, डॉ.योगी, श्री अनंता पाठक, श्री माधवराव भालेराव, श्री रोया अनंतानी या टीमने जन जागृन करण्याचे आयोजन केले असून यामध्ये लंम्पी आजाराचे लक्षणे पुढील प्रमाणे सांगीतलेले आहेत. पशुधानांचे डोळे लाल होणे, त्यातून पाणी येत असणे, त्वचेवर गाठी दिसणे, त्या गाठीमध्ये पु होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत संपर्क साधण्याची विनंती सौ राजश्री जामगे यांनी केले आहे.
‘ ही माझी जबाबदारी आहे” असे म्हणून आपण सर्वजन निश्चिंत मनाने काम करुया व पशुधन वाचविण्याचे कार्य करुया . या पुढे ही जबाबदारी सर्वांचीच आहे. राजस्थानात मोठ्या प्रमाणात हा आजार पसरलेला आहे. महाराष्ट्रत मात्र या आजाराची तीवृता कमीच आहे . महाराष्ट्रातील अकोला , नगर व जळगाव या जिल्ह्यात या रोगाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात दिसत आहे.