चंद्रपूर जिल्ह्यात ऐकून 7 पोसिटीव्ह कोरोना बधितांची पडली भर-राज्य राखीव दलाचे 3 जवान ,चंद्रपुरातील 4 पोसिटीव्ह बाधित

25

🔺चंद्रपूर बाधितांची संख्या १२५ वर

🔺आतापर्यत ६२ कोरोनातून बरे
🔺६३ बाधितांवर उपचार सुरू

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि:-7 जुलै)जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ७ पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामध्ये ३ राज्य राखीव पोलीस दलाचे जवान ( एसआरपीएफ ) आहेत. ते पुणे येथील मूळ निवासी आहेत. त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या बाधितांमध्ये गणना होणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या तिघांना वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील रविवारी १२१ वर असणारी कोरोना पॉझिटीव्ह संख्या वाढून सोमवारी १२५ झाली आहे. ( *१२८ -३ पुणे=१२५* ) आतापर्यंत ६२ बाधित कोरोना मुक्त झाले आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या संक्रमितांची संख्या ६३ आहे.
*मंगळवारी* दुपारी जिल्हा आरोग्य यंत्रणेनेकडून वरील माहिती देण्यात आली. माहितीनुसार पुणे येथील रहिवाशी असलेल्या आणि संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या २३, ५३ व २३ वयाच्या तीन जवानांचे रविवारी घेण्यात आलेले स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्व पुणे येथून आले होते. एक जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवाण संस्थात्मक अलगीकरणात होते.
तर सोमवारी दिवसभरात एकूण ४ रुग्ण चंद्रपूर जिल्हयात पॉझिटीव्ह ठरले आहे. यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून २६ जून रोजी परत आलेल्या २७ वर्षीय ऊर्जानगर येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.
याशिवाय पडोली येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या ३६ वर्षीय नागरिकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने दोन ठिकाणी खाजगी इस्पितळात ताप आल्यामुळे तपासणी केली होती.
तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या २ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह आला आहे.
दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मौदा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) आणि ६ जुलै ( एकूण ४ ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १२५ झाले आहेत. आतापर्यत ६२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १२५ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ६३ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.