आठवले समाजकार्य महाविद्यालयात “शाश्वत विकास” विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

15

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.28सप्टेंबर):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे “शाश्वत विकास” विषयावर नुकतेच राष्ट्रीय परिसंवाद संपन्न झाले.

या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून डॉ. चंदनसिंग रोटेले, प्रमुख पाहुणे नागपुर विद्यापीठाचे डॉ. स्मिता आचार्य, विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरी, श्रमिक एल्गार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पारोमीता गोस्वामी, माजी सिनेट सदस्य किरणताई रोटेले, आरेंजसिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कुमार मेश्राम, प्राचार्य शरला शनवारे भंडारा, प्राचार्या डॉ. शुभांगी लुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाश्वत विकासामध्ये अनेक पैलू आहेत. मात्र शिक्षण क्षेत्राचा शाश्वत विकास झाल्यास अनेक पैलूंचा उखल लवकर होते. शाश्वत विकास करीत असताना “मानव” केन्द्रस्थानी असावा असे सांगत पारोमिता गोस्वामी यांनी शाश्वत विकासाचे अनेक उदाहरण विषद केले.

“एज्युकेशन फॉर सस्टीनेबल डेव्हलपमेंट अँड सोशलवर्क इंटरवेन्षन” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विषयाचे अनुषंगाने सखोल मार्गदर्शन केले. सदर परिसंवाद चार सत्रात घेण्यात आले. यावेळी सहभागी विद्यार्थाना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुदर्शन खापर्डे, डॉ. गजानन बन्सोड, प्रा. शिल्पा गणवीर यांनी केले. उपस्थितांचे आभार कु. रेवतकर हिने मानले.