निष्पक्ष काम करणाऱ्या अर्शीया जुही यांना घूग्घुस नगरपरिषद चे स्थायी मुख्याधिकारी नियुक्त करा…. आम आदमी पार्टी घूग्घुस ची मागणी

36

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घूग्घुस(दि.30सप्टेंबर):- नगरपरिषद होऊन जवळपास दोन वर्ष लोटून गेलेली आहे. परंतु इथे अजूनही स्थायी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ज्यामुळे घूग्घुस शहरातील कामे पूर्णपणे ठप्प पडलेली आहेत. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही महिन्यां करिता घूग्घुस नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अर्शिया जुही या आपल्या कामाप्रति कर्तव्य निष्ठ आहे. त्यांच्या कालावधी मध्ये घूग्घुस शहरातील कामाला वेग मिळाला होता ज्यामध्ये पाण्याची समस्या, स्वच्छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या अनेक कामांनी शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचे काम यांच्या कालावधी मध्ये झाले.

यांच्या नंतर सुद्धा अस्थायी रुपी मुख्याधिकारी आलेत परंतु त्यांनी घूग्घुस शहराकरीता कोणतेही कामे केलेली नाहीत. घूग्घुस शहरात पहिल्यांदा नगरपरिषद निवडणूक आगामी काळात होणार आहे व पहिल्यांदा नगरपरिषद समिती निवडून येणार आहे अशावेळी मुख्याधिकारी हा कर्तव्यदक्ष व कायदा सुव्यवस्था या गोष्टींवर तरबेज असावा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्सेवर योग्य निराकरण होईल.

या सर्व बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी अर्शिया जुही यांना परत स्थायी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार चंद्रपूर यांच्या कडे केली.

शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.