चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा

18

🔹खासदार अशोक नेते यांनी विभागीय आयुक्त यांना दिले पत्र

✒️चिमूर( रामदास हेमके,विशेष प्रतिनिधी)

चिमूर (7 जुलै):-चिमुर क्रांती जिल्हा निर्माण करण्याची प्रलंबित मागणी असून जिल्हा संदर्भात एकेक शासकीय कार्यालय आनण्याचे कार्य आमदार बंटीभाऊ भांगडीया करीत असताना त्यांच्या प्रयत्नांनी चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले असताना मात्र शासन प्रशासन टाळाटाळ करीत आहे प्रशासनाने चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी केली असून विभागीय आयुक्तांना पत्र दिलेले आहे .

चिमूर ही क्रांती भूमी असून स्वातंत्र्य चळवळीत अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले असून सन 1942 च्या चलेजाव आंदोलनात चिमूर स्वंतत्र घोषित झाले होते.
चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर क्रांती नगरीचा कायापालट करीत अनेक शासकीय कार्यालये आणली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर ला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केली होती तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सतत पत्रव्यवहार व भेटी घेत पद स्थापना ,अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी तसेच अप्पर जिल्हाधिकारी ची नियुक्ती आदेश निघाला तेव्हा अजून पर्यत चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झालेले नाही त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे याची दखल खासदार अशोक नेते यांनी घेतली असून विभागीय आयुक्त महसूल नागपूर यांना पत्र देऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी केलेली आहे.