भगवती देवी विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसिकरण

44

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.30सप्टेंबर):-दि. 29/ 09/ 22 रोज गुरुवारी सकाळी 11 ते03 पर्यंत भगवती देवी विद्यालय, देवसरी च्या भव्यप्रांगणात लसीकरण शाळेत करण्यात आले. यामध्ये वयोगट 12 ते 14… 38तर 15 ते 18 वयोगटात… 40 असे एकूण 78 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. जवळपास विद्यालयाचे 95% लसीकरण झाले. त्यामुळे डॉक्टरच्या टिमने समाधान व्यक्त केले. ह्याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर बागल व युवराज शिंदे (आरोग्य सेवक) एम.एन. राणे (आरोग्यसेविका)एस.ए. पठाण व के.जे. गिरी (आशा वर्कर )यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळेस विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी सोबत डॉक्टरच्या टीमने विद्यालयातील कर्मचारी मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे सर, सुपरवायझर दिनेश वानरे, दिगंबर माने, शेख सर, गणेशराव शिंदे, अल्लडवार सर, कबलेसर,सुरोशे सर, मारोती महाराज, अरविंद चेपुरवार, भागवत पाटील जाधव यांची आवर्जून उपस्थिती होती. विशेष म्हणजे निसर्गमय वातावरणात विद्यार्थ्यांचे लसीकरण हसत खेळत करण्यात आले. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले.