टाकाऊ पासून टिकाऊ चित्र साकारणारा चिमुकल्या आर्किटेक

33

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.30सप्टेबर):- तालुक्यातील कारखेड या ग्रामीण भागातील चिमुकला आर्किटेक जय काळबांडे हा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी यांनी टाकाऊ पुठ्ठ्यापासून दीक्षाभूमी, लाल किल्ला, सुवर्ण मंदिर, ताजमहल सारख्या विविध प्रतिकृती चित्र साकारले आहेत यासह विविध वस्तूही बनवीत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

उमरखेड तालुक्यातील कारखेड येथील एका गरीब कुटुंबातील एक उमेद कलाकार पेंटर गजानन भाऊराव काळबांडे हे त्यांची कला व पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी आतापर्यंत संपूर्ण तालुक्यातील व तालुका बाहेरील अनेक शाळांची कलरिंग व पेंटिंग केली आहे त्यामुळे ते नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतात.

हे करताना त्यांचा मुलगा जय गजानन काळबांडे हे वडील जे कृती करीत असतो तो ते नेहमी मन लावून बघताना वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जय याने खूप कमी वयात मोबाईलच्या युट्युब वर बघून चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आणि ते चित्र कलाकृती हुबेहूब चित्र साकारतो त्यानुसार त्यात रंग भर्ती त्यासोबतच युट्युब वर बघून नवीन काहीतरी वेगळे करण्याचा तो प्रयत्न करीत असतो.

आज तो या टाकाऊ पुठ्ठ्यापासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू तयार करीत असतो त्यात त्यांनी कार्ड सीट, पुठ्ठ्यापासून बोरींग मशीन,घर ,मंदिरे ,रोबोट सायन्स गॉगल, रणगाड्या,डीजे , एटीएम ,बाइक, रेस कार ,एसटी बस,लाल किला ,सुवर्ण मंदिर, असे अनेक साहित्य बनविले.

विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 ऑक्टोबर 1956 रोजी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची शिक्षा घेतली ते ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी त्यांची प्रतिकृती टाकाऊ पुठ्ठ्यापासून जय काळबांडे यांनी हुबेहूब दीक्षाभूमी साकारण्याचा प्रयत्न केला
.अगदी सुंदर व हुबेहूब अशी दीक्षाभूमी त्यांनी साकारलेली आहे आणि त्याच प्रमाणे त्याला रंगही दिला आहे.

महात्मा फुले विद्यालयात इयत्ता सहावी चा विद्यार्थी असलेला जय काळबांडे यांनी विविध चित्र साकारले होते त्यासाठी त्यांच्या वर्ग शिक्षकाकडून मुख्याध्यापका कडून व सर्व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमच्या प्रतिनिधींनी जय काळबांडे व कुटुंबातील मंडळीची भेट घेतली असता जय हा मोठा होऊन आर्किटेक होणार व आपल्या भारतातील सुंदर सुंदर वास्तुत निर्माण करणार असल्याचे सांगितले.