चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करा-प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

15

✒️सुयोग सुरेश डांगे(लविशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.30सप्टेंबर):- चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात यावी सावरी परिसरातील ५० विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बोथली येते दररोज ये जा करीत असतात.

सावरी ते बोथली हे ५ किलोमीटरचे विद्यार्थी प्रवास सायकलने करतात तरी विद्यार्थी प्रवास करताना जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात वन्यप्राणी वावर जास्त प्रमाणात दिसून येते या परिसरात वाघ, अस्वल डुकर या परिसरात नेहमी धुमाकूळ असतो.

तरी विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.